उत्सव

Festival Information in Marathi भारत सण आणि उत्सवांची भूमी आहे आणि भारतात बाराही महिने विविध उत्सव साजरे केले जातात. भारतीय सण एकाच देशातील भिन्न धर्म आणि संस्कृतींचा दर्शन घडवतात. कोणत्याही उत्सवाच्या दिवशी आपल्या आजूबाजूचे संपूर्ण वातावरण उत्साहाने भरलेले असते. लहान गावे असो किंवा मोठी शहरे, सर्वजण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. काही महत्वाचे भारतीय सण म्हणजे होळी, दिवाळी, दसरा, दुर्गा पूजा, महाशिवरात्रि, राखी इ आहेत. काही इतर सण म्हणजे ईद, गुरु नानक जयंती आणि ख्रिसमस इत्यादी आहेत. हे सर्व सण भारतात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
लोक नातेवाईक आणि मित्रांसह सण साजरे करण्यासाठी एकत्र येतात. उत्सव साजरा करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आणि लोक एकमेकांच्या घरी भेट देतात. भारतात देशभक्तीच्या आवेशाने तीन राष्ट्रीय उत्सव साजरे केले जात्तात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंती हे तीन राष्ट्रीय सण आहेत.

Scroll to Top