कॉर्नफ्लोर घरी बनविण्याची साधी आणि सरळ पध्दत -A simple way to make cornflour at home in marathi कॉर्नफ्लोर हे स्वयंपाक करताना खूप महत्वाची बाब आहे. आणि हा प्रकार जास्त तर चिनी फूड मध्ये उपयोगात येतो. तुम्हाला माहित आहे का ? कॉर्नफ्लोर हे आपल्या सौन्दर्य साठी सुद्धा वापरले जाते .
नेहमी उपयोगात येणार हे कॉर्नफ्लोर हे आपण विकतच आणाव असं गरजेचं नाही तर याला आपण आपल्या घरी सध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा बानवू शकतो. आणि हे कॉर्नफ्लोर विकतच्या कॉर्नफ्लोर पेक्षा सुरक्षित ठरू शकत .
कॉर्नफ्लोर घरी बनविण्याची साधी आणि सरळ पध्दत -A simple way to make cornflour at home in marathi
चला तर जाणून घेऊया याच्या काही प्रकिया.
कॉर्नफ्लोर बनविण्या साठी सर्वात आधी मका निवडून टाकावा. त्यानंतर तो कडक उन्हात वाळायला घालावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका मोठया भांड्यात एक लिटर पाणी गरम करावं. त्यानंतर ते मक्याचे दाणे गरम पाण्यात घालावे .ते दाणे 15-20 मिनिट छान उकळू द्यावेत.त्या नंतर गॅस बंद करावा. मक्याचे दाणे पाण्यात ठेवावे आणि पाणी थंड झाल्या वर त्या दाण्याचे सालं काडून घ्यावीत.
सालं काढलेले मक्याचे दाणे मिक्सर मधून बारीक करून घ्यावेत. तो पावडर एका भांड्यात काढावा. त्यात पाणी घालून ते छान असं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर ते मिश्रण एक जाड कपड्यात काढून त्याच पाणी सोखायला उन्हात ठेवावा. त्याचे पाणी सोखल्यानंतर जो पाऊडर राहतो तो कॉर्नफ्लोर असतो.
घरी केलेलं कॉर्नफ्लोर जास्त टिकतं. कॉर्नफ्लोर हे साधरणतः काचेच्या किव्हा हवा बंद डब्यात ठेवावा. कोंणतेही कुरकुरीत पदार्थ बनविण्यासाठी कॉर्नफ्लोर याचा उपयोग केला जातो. जसे बिस्कीट, सॉसेस, पाय, पुडिंग, असे पदार्थ तयार करण्या साठी याचा उपयोग केला जातो.