आदर्श शिक्षक- AAdarsh Shikshak Story In Marathi एका लग्नाच्या समारंभात शरदला एक ओडखींचा चेहरा दिसला. तो त्याच्या जवळ गेला आणि विचारले, “आपण मला ओडखले का? त्या व्यक्तीने नीट निरखून शरदला पहिले आणि म्हणाले, “हो, तू माझ्या शाळेचा विद्यार्थी!कसा आहेस? काय करतोय आजकाल ?शरदला आनंद झाला कि त्याच्या शाळेच्या सरांनी त्याला ओळखले.
शरदने उत्तर दिले, “सर, मी पण तुमच्या सारखा शिक्षकच आहे. माझे शिक्षक होण्यामागचे कारण तुम्हीच आहात.
आदर्श शिक्षक- AAdarsh Shikshak Story In Marathi
” सरांनी विचारले, “ते कसे ? शरद ने उत्तर दिले कि, “एकदा वर्गातील एका मुलाचे एक अतिशय सुंदर घड्याळ मी चोरलहोते. तुम्ही सर्व वर्गाला सांगीतले कि ज्याने घड्याळ चोरले असेल त्याने ते परत करावे. मला घड्याळ परत करायचे होते पण लाजेने धाडस होत नव्हते तुम्ही संपूर्ण वर्गाला डोळे मिटून भिंतीकडे तोंड करून उभे राहायला सांगितले.
आणि सर्वांचे खिसे शोधून माझ्या खिशातून घड्याळ काढले आणि माझे नाव न घेता घड्याळ त्याच्या मालकाला परत केले. या कृत्यामुळे तुम्ही माझी अवहेलना केली नाही.
सगळ्यांसमोर माझे नाव उजागर केले नाही हे बोलताना शरदच्या डोळ्यात पाणी आले “तेव्हा मी ठरवले कि असे परत करायचे नाही. त्या दिवशी मी तुमच्या सारख्या शिक्षक होण्याचा निर्णय केला. सर शरद कडे पाहत म्हणाले, “गोष्ट अशी आहे बेटा, मुलांचे खिसे शोधताना मी सुद्धा डोळे मित्तले होते. मला आज कळले कि तू ते घड्याळ चोरले होते. हे ऐकून शरदच्या मनात आदर अजून वाढला.
कुठल्याही व्यक्तीचे व्यक्ती महत्व घडवण्यासाठी आई वडिलांचा जेव्हा वाटा असतो. तेवढाच शिक्षकाचा सुद्धा असतो.