अनपेक्षित भेट-Anpekshit Bhet Story In Marathi परोपकारी मनाच्या एका व्यापाऱ्याने चांगले कार्य करण्याचा एक चांगला मार्ग विचार केला. तो एका गरीब बांधकाम ठेकेदाराला ओडखत होता. जो त्याच्या हवेलीजवळ झोपळीत राहत होता. व्यापाऱ्याने त्याच्या झोपडी शेजारी घर बांधायचे होते. अशी इच्छा व्यक्त केली.
अनपेक्षित भेट-Anpekshit Bhet Story In Marathi
तो ठेकेदाराळ म्हणाला. “उत्तम दर्जाच्या मटेरियलने आणि अत्याधुनिक डिझाईन वर आधरीत घर बांध. मी एक वर्ष्यानंतर परत येईन”. झापताप आणि सहज पैसे कंसाच्या लोभाने, ठेकेदाराने एक युक्ती योजली. व्यापारी कामाची देखरेख करण्यासाठी उपस्थित नसल्यामुळे, त्याने निकृष्ठ साहित्याचा वापर करून घर बांधले. इमारतीची मजबुती कमी होत आहे हे जाणून त्याने सर्वात मोठी कपात केली. आणि शेवटी क्रॅब फिनिश पेंट आणि पॉलिश ने सर्व झाकले.
एक वर्षानंतर व्यापारी परत आला तेव्हा ठेकेदाराने त्याला घराच्या चाव्या दिल्या. व म्हणाला कि त्याने सर्व सूचनांचे पालन केले आहे. “तुझ्यासाठी चांगले ” व्यापारी हसत म्हणाला. “खरंतर हे घर मी तुझ्यासाठीच बांधले आहे. म्हणून चाव्या परत घे. तुला शुभेच्च्या.” ठेकेदार डोळे वटारून व्यापाऱ्याकडे पाहतच राहिला. त्याला कळून चुकले कि त्यांनी स्वराच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.
तात्पर्य :- दुसऱ्याचे चांगले करा तर तुमचे चांगले होईल.