केळी खाण्याचे फायदे..- Benefits Of Eating Banana In Marathi केळी हे फळ सर्व फळांपेक्षा स्वस्त व मस्त फळ आहे. याचे खूप फायदे आहेत. दररोज जर आपण डायट घेत असाल तर त्यात केळीचा समावेश केल्याने तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. केली तुन आपल्याला खूप लाभदायक घटक मिळतात.
केळी खाण्याचे फायदे..- Benefits Of Eating Banana In Marathi
केळीमध्ये पोटॅशियम,व्हिटॅमिन B६ त्याच सोबत फायबर असे अनेक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत. लहान मुलांना सुद्धा केली खूप आवडतात कारण केळी चवीसाठी गोड असतात.
बाकीच्या फळांपेक्षा सर्व दर्जाच्या लोकांना परवडणारे फळ आहे.यामुळे केळी सर्व लोक खाऊ शकते. त्यात पोषक तत्व असल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा याचा परिणाम होईल. आपल्याला जर काही खायची इच्छा नसली तर आपण उपाशी पोटी केळी खाल्ली तर आपल्याला एनर्जी मिळते कारण केळीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आहे. यामुळे जे लोक व्यायामशाळेत जातात ते लोक त्यांच्या रोजच्या आहारात केळी खातात. कारण त्यातून त्यांना एनर्जी मिळते आणि त्यांचे वजन सुद्धा वाढत नाही.
केळी खाण्याचे फायदे..
१) फायबर च प्रमाण जास्त:-
केळीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. फायबर चे दोन प्रकार असतात त्यात एक विघटनशील आणि एक अविघटनशील असे दोन प्रकार असतात. त्यातील दोन्ही प्रकार केळीमध्ये उपलब्ध असतात. आपण जेवण केलेले अन्न फायबर हळू पचवते त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि आपले पोट भरून असलेले जाणवते.यामुळे जर आपण सकाळी केळी खाल्ली आणि त्यादिवशी आपल्याला काही खाण्याचा वेळ नाही मिळाला तर त्याचा आपल्याला फारसा त्रास होत नाही.
२) हृदयास लाभदायक:-
केळी आपल्या हृदयाला सुद्धा गुणकारक आहे. शरीराला मिनरल्स मिळण्यासाठी आपल्याला पोटॅशियम गरजेचे असते आणि हे पोटॅशियम केळीत असते. यामुळे आपल्याला रक्तदाबाचा त्रास होत नाही. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होते. जर रक्त दाबाचा त्रास झाला नाही तर हृदयविकाराचा धोका नसतो. यामुळे केळी हृदयाला सुद्धा लाभदायक आहे.
३) वजन कमी करते आणि पचनक्रिया सुरळीत होते:-
केळीचे चव गोडसर आंबट आहे. आणि आंबट वस्तू पचन सुरळीत करते.यामुळे आपल्याला आपले पोट भरलेले सुद्धा जाणवते. भुकेचा फारसा त्रास होत नाही. यामध्ये पुरेश्या प्रमाणात साखर सुद्धा असते त्यामुळे आपल्याला एक केळी खाल्ल्याने आपले पॉ भरलेले जाणवते.