काकडी- Cucumber Information In Marathi काकडी हा प्रकार आपण आपल्या रोजच्या आहारात घेत असतो. काकडीचा वापर जेवणात सलाड म्हणून केल्या जाते. त्याचसोबत जेवण करताना काकडीची चटणी सुद्धा बहुतांश ठिकाणी बघायला मिळते.काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
याचा सर्वात मोठा फायदा आपल्या त्वचेला होतो. उन्हाळ्याचा हंगामात काकडी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते कारण काकडी हा प्रकार थंड आहे.
काकडी- Cucumber Information In Marathi
काकडी खाल्ल्याने आपले शरीर थँडे राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात ऊन तापत असल्याने काकडी खाणे आपल्या शरीरासाठी खूप पोषक ठरते. काही लोक यात बिचकतात कि काकडी हा प्रकार फळ आहे कि भाजी? तर काकडी हे कोणत्याही प्रकारचे फळ नसून त्याला भाजी म्हणून ओळखल्या जाते.
काकडीमध्ये अँटीऑक्ससईडीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात. हा घटक आपले शरीर थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. काकडी मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते ज्यामुळे आपल्याला शरीराला हवे तितकेच प्रमाणात कॅलरी मिळतात. यामुळे याचा वापर डायट मध्ये सुद्धा केला जातो.
काकडीच्या पाणी खूप मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपण उन्हाळ्यात काकडी खात असाल तर तुमच्या शरीराला काही प्रमाणात पाण्याचा पुरवठा सुद्धा होईल. काकडी पासून औषध सुद्धा बनविली जाते. काकडीचे रोप वेली प्रमाणे असते. काकडी सोलून खाण्याच्या ऐवजी ते साली सकट खाणे जास्त पोषक असते.
काकडी खाण्याचे काही फायदे :-
१) रोगप्रतिकारशक्ती वाढते :- आपण आपल्या रोजच्या आहारात काकडीचा वापर करत असाल तर त्याच्यात असलेल्या कमी प्रमाणाच्या कॅलरी मुळे आपले वजन वाढत नाही आपल्या शरीराला हवे तेवढ्या प्रमाणातच कॅलरी मिळते त्यात पाण्याची मात्रा खूप जास्त असते. असे म्हंटल्या जाते कि काकडीत ९६% पाणी आहे.
सध्या प्रत्येक व्यक्ती कोणताही आजार असतो. किंवा होण्याची भीती असते. त्या साठी आपल्या शरीरात अँटी ऑक्ससईडीस असणे गरजेचे आहे. जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. आणि या प्रकारच्या रोगांपासून आपला बचाव करते.
फळ आणि भाज्यांमधून मिळणारे पोषक तत्व आपल्याला काकडीतून सुद्धा मिळते. काकडीमधील विशेष प्रमाणाची प्रोटीन आपल्याला कोणताही आजार होण्यापासून दूर ठेवते.
२) डिहायड्रेशन टाळते :- आपल्या शरीरात खूप प्रमाणात पाणी अणे खूप गरजेचे आहे. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते खूप कामात येत. शरीरातील तापमान नियंत्रित करण्याचे कमी सुधज पाणीच करते.
आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असलेल्या हैड्रेशनमुळे आपले शरीर निरोगी असते. आपण काकडीचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने आपल्याला पाणी खूप जास्त प्रमाणात मिळते जे आपल्या आरोग्यास निरोगी राहण्यास मदत करते. काकडी प्रामुख्याने हायड्रेशन पूरक आहे जे आपल्या शरीरासाठी वेगळ्याच प्रमाणाचे संरक्षण करते.
३) वजन कमी होण्यास मदत :- काकडीच्या कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने आपल्या शरीराला हवे तेवढ्याच प्रमाणात कॅलरी मिळते आणि यामुळे आपले पचन सुद्धा चांगल्या प्रकारे होते यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. असे म्हणतात कि एक कप काकडीमध्ये १६ कलारू असते.
एवढ्या कमी प्रमाणात कॅलरी काकडीत असते. याचा अर्थ असा होतो कि आपण काकडी खाल्ल्याने आपल्याला वजन वाढण्याचा धोका नसते. काकडी खाल्ल्याने आपले वजन कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते. डायट मध्ये सुद्धा काकडीचा वापर केला जातो.