चिकू बद्दल माहिती – Information About Chiku In Marathi

चिकू बद्दल माहिती – Information About Chiku In Marathi चिकू एक औषधी फळ आहे. ज्यामध्ये आपल्या शरीराला लागणारे संपूर्ण प्रकारचे पोषक घटक आहे. चिकू च्या रसापासून विविध प्रकारच्या औषधी बनविल्या जातात.

चिकू चा रंग तपकिरी रंगाचा असून त्याची त्वचा उग्र स्वरूपाची आहे. परंतु चिकू खायला मात्र गोड आहे. चिकू चा रंग जसा बाहेरून तपकिरी आहे तसाच तो आतून सुद्धा त्याच रंगाचा आहे.चिकूला आतून काळ्या रंगाच्या बिया असतात. आपल्याला माहिती नसेल कि चिकू च्या बियांपासून तेल बनविल्या जाते. आणि हे तेल आपल्या केसांसाठी खूप पोषक असते. ज्याचा वापर लोक त्यांचे केस वाढविण्यासाठी देखील करतात.

चिकू बद्दल माहिती – Information About Chiku In Marathi

Information about chiku

बाकीच्या काही फळांसारखे चिकूचे असे ठरवलेले काही वेगळे ऋतू नाही कि ते त्याच ऋतूला उपलब्ध असते. ऋतू कोणताही असुद्या चिकु प्रत्येक हंगामात उपलब्ध असते. आणि खायला नेहमी गोड स्वरूपाचा असते.

चिकू या फळात प्रत्येक पोषक घटक असतात त्यात पाण्याची मात्रा खूप जास्त प्रमाणात असली तरी त्यात बाकीचे घटक जसे, प्रोटिन, कार्बोहायड्रेट्स,फॅट्स, व्हिटॅमिन ए, व व्हिटॅमिन सी या प्रकारचे घटक मुबलक प्रमाणात असतातच. त्याचसोबत लोह आणि फॉस्परस च प्रमाण सुद्धा असतेच. यात असलेले व्हिटॅमिन इ ची मात्रा मुबलक प्रमाणात असल्याने चिकू आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

चिकु खाताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या. चिकू खाताना चिक्को कच्चे खाणे जास्त प्रमाणात टाळावे कारण कच्चे चिकू खाल्ल्यास आपले पोट दुखू शकते. आणि त्यात आपण पिकलेले चिकू खात आहात तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

बाकीच्या ऋतूंपेक्षा चिकू खाण्याचे प्रमाण हिवाळ्यात जास्त प्रमाणात असते. हिवाळ्यात खूप लोक चिकू चे सेवन जास्त प्रमाणात करतात. आपण आपल्या आहारात चिकूचा समावेश केला तर त्यात आपल्याला आणि आपल्या आरोग्याला त्याचा खूप मोठा फायदा होतो. चला तर जाणून घेऊया चिकु खाण्याचे काही फायदे.

चिकू खाण्याचे काही फायदे :-

१) पचनक्रिया सुधारते –
आपल्याला सर्वांना माहितीच आहे कि फायबर आपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारते. आणि चिकू या फळात फायबरचे प्रमाण असतेच आणि यामुळे आपल्या शरीरातील अन्नाला पचायला मदत होते. यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास आहे अशा लोकांना चिकू खाणे खूप आवश्यक आणि फायदेशीर ठरते.

आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत असल्याने आपल्या आतड्यांवर सुद्धा जास्त प्रमाणात ताण येत नाही आणि यामुळे आपल्या आतड्यांवर सुद्धा जास्त प्रमाणात ताण येत नाही.

२) पोटांच्या समस्या दूर होते :-
चिकू मध्ये मुबलक प्रमाणात सगळेच घटक असतात त्यात एक टॅनिन नावाचा घटक सुद्धा असतो जो आपल्या पोटाशी संबंधित सर्व समस्या कमी करण्याचे काम करतो. या टॅनिन नावाच्या घटकात काही असे घटक असतात कि जे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करते.

टॅनिन हे एक अँटी-इंफ्लामेंटरी एजंट सारखं काम करत असते. ज्यामुळे आपल्या पोटाच्या निगडित समस्या दूर होतातच आणि त्या सोबत आपले आतडे सुद्धा सुरक्षित ठेवण्याचे काम करते.यामुळे जर आपल्याला समोर केव्हाही पोटाची समस्या झाली कि त्यावेळी चिकु खाणे विसरु नका.

३) सर्दीची समस्या दूर होते :-
जास्तीत जास्त लोकांना सर्दीचा सामना हा नेहमीच करावा लागतो. काही लोकांना काही वस्तू बद्दल एलर्जी असते तर काही लोकांना सर्दी हा त्यांना नेहमीचाच प्रश्न असते. त्यातही लोकांना थंडीच्या दिवसात सर्दीचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो.

अशा वेळी खूप लोकांना श्वासाचा देखील त्रास होतो. यासाठी चिकू मध्ये असे काही घटक असतात कि आपल्या छातीत अडकलेला कफ आपल्या नाकावाटे बाहेर काढायचे काम करते आणि आपल्याला सर्दीपासून सुटका मिळते. चिकू थंड असल्याने काही लोक मानतात कि चिकू खाल्य्याने सर्दी होते पण असे नसून चिकू खाल्ल्याने आपली सर्दी बरी होते.

४) आपली हाडे मजबूत होतात :-

आपल्या शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक आवश्यक असतात. अशा प्रकारचे घटक चिकू मध्ये असतात. चिकू आपल्या आरोग्यासाठी सर्व मार्गाने सुरक्षित आहे. ज्यामध्ये सर्व घटक मुबलक प्रमाणात असते. ज्यावेळी आपल्याला हाडाचा त्रास सुरु होतो त्यावेळी आपण चिकू खाल्ले पाहिजे आणि आपले आरोग्य बरे केले पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top