जांभूळ बद्दल माहिती – Information about Indian Blackberry In Marathi

जांभूळ बद्दल माहिती – Information about Indian Blackberry In Marathi आपण प्रत्येक फळ खात असतो कारण फळात खूप प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला अत्यंत महत्वाचे असतात त्यात आपल्या शरीराला हवे त्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, मिनरल्स आणि फायबर्स असतात. त्यातलंच एक फळ म्हणजे जांभूळ. जांभूळ हे एक असं फळ आहे कि आपल्याला उन्हाळ्यातच याला बघायला मिळते.कारण प्रत्येक ऋतूत हे उपलब्ध नसतं.

जांभूळ बद्दल माहिती – Information about Indian Blackberry In Marathi

जांभूळ बद्दल माहिती

जांभूळ एक हंगामी फळ आहे. जे फळ फक्त उन्हाळ्यातच कायला मिळते. जसा उन्हाळ्याची सुरुवात झाली त्यादरम्यान जांभळाच्या झाडाला बहर येण्यास सुरुवात होते.बाकीच्या फळांप्रमाणेच जांभूळ सुद्धा खूप लोकप्रिय आहे खूप लोक याला मोठ्या आवडीने खातात.

जांभळाची चव खायला गोड असल्याने आपण चटकेदार मसाल्यासोबत जांभूळ खात असलो तर त्याची चव तर औरच लागते. आणि कायला दुप्पट मजा येते.

खूप लोक जांभूळ याची चव छान आणि खायला स्वादिष्ट आहे यासाठी जांभूळ खात असतात परंतु जांभूळ खाणे आपल्या शरीरासाठी देखील महत्वाचे आणि आवश्यक आहे. जांभूळ या फळामध्ये असलेले काही पोषक घटक आपल्या आरोग्याची काळजी घेते आणि आपल्या आरोग्याला चांगले ठेवण्याचे काम करते.

त्यासोबत हे सुद्धा खूप कमी लोकांना माहिती असेल कि जांभूळ याचा वापर औषधी बनविण्यासाठी देखील केला जातो. कारण याफळामध्ये खूप प्रमाणात औषधी गुणधर्म असतात.

जांभूळ आपल्या शरीराला खूप प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करते. आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते. जांभळाचे नाव त्याचा गळद जांभळ्या रंगापासून ठेवण्यात आले. जांभूळ खाताना आपल्याला काही प्रमाणात त्याची माहिती असणे सुद्धा गरजेची आहे. कारण आणि निश्चित प्रमाणात जांभूळ न खाऊन त्याहूनही जास्त प्रमाणात जांभळाचे सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकते.

Also Read:  टेन्शन मध्ये असताना मन एकाग्र कसे ठेवायचे ? How to keep mind focused when under tension ?

कारण जांभूळ खाणे आपले शरीराला जेवढे पोषक आहे तेवढेच हानिकारक सुद्धा आहे. चला तर जाणून घेऊ जांभूळ खाण्याचे काही फायदे.

जांभूळ खाण्याचे काही फायदे :-

१) अपचनाचा त्रास दूर होतो :-
जांभूळ या फळामध्ये मुबलक प्रमाणात सर्व प्रकारचे घटक असतात. त्यात आपल्याला आपल्या आरोग्यासाठी हवे आणि आवश्यक असे घटक आहेत. जांभूळ हे एकाच हंगामात असते आणि त्यावेळी आपण त्याचा फायदा घेत. जास्त प्रमाणात जांभूळ खाल्ले तर आपल्याला आपल्या पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. आणि आपल्याला पोटाशी संबंधी कोणतीही समस्या असल्यास ते दूर करण्याचे काम जांभूळ करते.

त्याचसोबत आपल्याला पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा आजार होण्यास आपला बचाव करते. ज्या लोकांना वारंवार पोटदुखीचा त्रास होतो. पोटदुखीचा त्रास जास्त प्रमाणात लहान मुलांना होते आणि हा त्रास दूर करण्यासाठी त्यांना जांभूळ खाण्यास द्यायला हवे. यामुळे पोटदुखीच्या त्रासाला आपण नक्कीच जांभूळ खाल्ले पाहिजे.

२) शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते :-
जांभूळ या फळामध्ये खूप आवश्यक घटक असतात. आपल्या शरीराला हवे आणि गरजेचे असे घटक जांभूळ या फळामध्ये उपलब्ध असतात. जांभूळ या फळामध्ये फायबर, मिनरल्स, प्रोटीन असे घटक असतात. जे आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात.

आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप गरजेचे आहे. आणि याचे प्रमाण जांभूळ मध्ये खूप मुबलक प्रमाणात असते. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम हे घटक जांभूळ या फळामध्ये खूप प्रमाणात असते.या आणि आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात असणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपल्या जांभूळ खाणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे.

३) किडनी स्टोन चा त्रास कमी होतो :-
जर एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन चा त्रास असेल आणि त्याला काय करावे ते माहिती नसेल तर अशा व्यक्तीला जांभूळ खाणे खूप फायदेशीर ठरते. आपल्याला या बद्दलचा कोणताही त्रास असल्यास आपण त्यांना योग्य प्रमाणात जांभूळ खायला घातले तर त्यांचा हा त्रास दूर होऊ शकतो. परंतु यासाठी जांभळाचे सेवन हे योग्य प्रमाणात केले पाहिजे.

Also Read:  द्राक्षे खाण्याचे काही फायदे-Some Benefits Of Eating Grapes In Marathi

जांभळामध्ये पौष्टिक घटक असल्याने आपल्या शरीरातील समस्या दूर करण्यात जांभूळ खूप कामात येऊ शकते. यासाठी किडनी चा समस्यांसाठी जांभूळ खाणे आवश्यक आहे.


About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment