NASA बद्दल माहिती – Information about NASA In Marathi NASA ही एक अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था आहे.“नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन” असा नासा चा अर्थ होतो.नासा ही अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असून जगातील सर्वात महत्वाची अंतराळ संशोधन संस्था म्हणून ओळखल्या जाते.
1958 मध्ये नासा ची स्थापना केली.आणि एरोनॉटिक्स अमेरिकेत राष्ट्रीय सल्लागार समिती म्हणजेच(एनएसीए)ची स्थापना करण्यात आली.नासाची स्थापना झाल्यानंतर जगात एक नवीन स्पेस शांतता पूर्ण पयोगांना प्रोत्साहन मिळाले होते.
NASA बद्दल माहिती – Information about NASA In Marathi
अमेरिकेत नासाची स्थापना झाल्यानंतर अमेरिकेतील जास्तीत जास्त अंतराळ विषयक काम हे नासाच्या देखरेखेखालीच होत होते.ज्यात खूप प्रकारचे मिशन आहेत.जसे,अपोलो मून लँडिंग,अंतराळ शटल आणि स्कायलॅब अवकाश स्थानक यांचा समावेश होता.
नासा अमेरिकेसोबत इतर आंतर राष्ट्रीय संस्थांना सुद्धा पाठिंबा देत आहे.आणि त्यांनी केलेल्या प्रक्षेपणाचे नियंत्रण सुद्धा करत आहे.नासाचे मुख्यालय हे अमेरिकेची राजधानी म्हणजेच वॉशिंग्टन डी.सी. मध्ये आहे.नासा सायन्स विषयक अनेक प्रकारचे संशोधन करीत आहे.
नासा ही सर्व देशांना मदत करत असून सुद्धा नासा ही अमेरिकेची सरकारी संस्था आहे असे आपण म्हणू शकतो.अमेरिकेला अंतराळ संशोधनात आणि अंतराळ विषयात माहिती आणि प्रोत्साहन देते त्याचसोबत अमेरिकेला या गोष्टीत प्रगती करणे असे नासा ची उध्दीष्टे आहेत.
1958 सालचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर त्यांच्या नेतृत्वाखाली नासाची स्थापना करण्यात आली.नासाच्या स्थापने पासून नासाने अंतराळ भागात खूप मोठे उपक्रम राबवले आहेत. ज्यामुळे नासाने अमेरिकेची अवकाश विषयात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नासाच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे मून लँडिंग नावाचा उपक्रम राबवला होता.या उपक्रमाद्वारे माणसाला चंद्रावर जाणे असा या उपक्रमाचे उद्दिष्ट्य होते.आणि अमेरिकेचा हा उपक्रम यशस्वी रित्या पार सुद्धा पडला. यासाठी नासाला त्यावेळी 20 अब्ज डॉलर इतका खर्च आला होता.1957मध्ये सोवियत युनियनने जगातील पाहिली मानवनिर्मित उपग्रह अवकाशात पाठवला होता.त्याचे नाव SPUTNIK असे होते.
त्यानंतर अमेरिकेने सुद्धा त्यांचे स्वतःची अंतराळ संशोधन संस्था स्थापन करण्याचा विचार सुरु केला आणि त्याच दरम्यान नासाच्या स्थापनेची वाटचाल सुरु केली.