काजू बद्दल माहिती – Information About Nuts In Marathi

काजू बद्दल माहिती – Information About Nuts In Marathi काजू हा प्रकार सर्वांना माहितीच असते. शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी काजू खाल्ले जाते.

काजू शरीराच्या आरोग्यासाठी खूप पोषक असतात. जे लोक बॉडीबिल्डिंग करतात ते लोक त्यांच्या दररोजच्या आहारात काजू घेतात कारण काजू मध्ये कॅलरी च प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. ज्यामुळे आपल्या शरीराला हवे तितकेच कॅलरी मिळते. त्यामुळे आपले वजन सुद्धा वाढत नाही आणि शरीरातील कॅलरी सुद्धा वाढते.

काजू बद्दल माहिती – Information About Nuts In Marathi

Nuts information in marathi

बॉडीबिल्डिंग करणारे लोक काजू सोबत जास्त प्रमाणात दूध पितात कारण काजू, दूध, आणि बदाम खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. यांसारखे पोषक तत्व दुसऱ्या कोणत्याच आहारात नसतात.

काजू ची चव सुद्धा सर्व लोकांना आवडते ते सर्वांना हवीहवीशी वाटते. सर्वच वयोगटातील लोक काजू मोठ्या आनंदाने खातात. काजू चा वापर खूप प्रकारच्या खाण्याच्या पदार्थात टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. कारण यामुळे त्या पदार्थाला चव सुद्धा छान येते. काजू हा कोणत्याही पदार्थात सहजपणे मिसळते.

काजू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण भागात पिकवले जाते. या भागातुन काजूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यामुळे जर आपण कोकण फिरायला जात असाल तर त्याठिकाणी खरेदी करण्यासाठी सर्वात चांगली वस्तू म्हणजे काजू. कारण या भागातील काजू खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असतात.काजूचे सेवन आपण कोणत्याही पदार्थासोबत जेवताना किंवा असे सुद्धा करू शकतो. नुकते काजू खाणे खूप छान असते.

काजू आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर असतो.काजू जास्त प्रमाणात उष्णकटिबंधीय म्हणजेच दमट वातावरणात पिकतात.काजूची झाड छोट्या आकाराची आणि छान डेकेदार असतात. काजूच्या झाडाला सफरचंदाच्या आकाराचे फळं लागतात. त्या फळांच्या खाली असलेला गर म्हणजेच काजू असते. त्यापासूनच काजू बनतात. काजूचे अनेक प्रकार आहेत त्यातील अनेक प्रकार बाजारात सहजपणे मिळतात.

Also Read:  चिकू बद्दल माहिती - Information About Chiku In Marathi

काजू खाण्याचे काही फायदे..

१) हृदयाला आरोग्यदायी :- काजूचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील सर्व भागांपैकी हृदयाला सर्वात मोठा लाभ होतो.काजू खाल्ल्यामुळे आपल्याला फॅट सुद्धा मिळते पण काहींना वाटेल कि फॅट आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, पण काही प्रमाणात फॅट शरीराला आवश्यक शुद्ध आहे.

काजु खाल्ल्याने शरीराला हवे तितकेच फॅट मिळते. आणि शरीरात कमी फॅट असल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या सुद्धा सुरळीत काम करणार ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका भासणार नाही. आपल्या हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालत राहील. त्याचसोबत काजू शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात ठेवते. आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा हृदयाचा धोका निर्माण होऊ देत नाही. आपल्या हृदयाच्या आरोग्याला चांगले ठेवण्याचे काम करते.

२) वजन नियंत्रणात ठेवते :- काजू मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्याचसोबत काजू मधुन शरीराला गरजेचे तेवढ्याच प्रमाणात कॅलरी आणि फॅट मिळते ज्यामुळे आपल्या वजनवर त्याचा फरक जाणवत नाही.काजू खाल्ल्यामुळे आपल्याला भूक सुद्धा लागत नाही. त्याचसोबत ज्याचे व्हज्म जास्त असेल त्याचे कमी करण्यासाठी सुद्धा काजू मदत करते. काजूमध्ये फायबरचा साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे.

काजू सर्वात जास्त फायबरयुक्त पदार्थ म्हणून ओळखल्या जाते. काजू खाल्ल्यामुळे आपले पोट भरते आपल्याला दुसरे काहीही खाण्याची इच्छा होत नाही. काजू मध्ये मॅग्नेशियम च प्रमाण सुद्धा असते जे आपल्या शरीरातील पचन शक्ती वाढवण्याचे काम करते. याच कारणाने आपले वजन नियंत्रणात राहते. आणि काही वेळी कमी सुद्धा होते.

३) केसगळती कमी आणि त्वचेसाठी पोषक :- काजू केसाच्या आरोग्यासाठी सुद्धा पोषक आहे. काजू मध्ये झिंक, आर्यन आणि फॉस्पेरुस चे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. याशिवाय काजू मध्ये प्रोटीनसुद्धा खचून भरलेले असते. हेच ते घटक जे केसाच्या वाढीला आणि मजबूतीला चालना देतात. आणि आपल्या त्वचेला सुद्धा चांगले बनवण्याचे काम करते.

काजूपासून बनवलेले तेल आपल्या केसांसाठी खूप पोषक असतात. आपण दररोज आपल्या आहारात काजूचा समावेश करत असाल तर त्याच्यापासून तुमच्या केसाला नक्कीच फायदा होईल आणि त्याचसोबत त्वचा सुद्धा मऊ येईल.

Also Read:  बदाम खाण्याचे फायदे..- The Benefits Of Eating Almonds In Marathi

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment