पपई बद्दल माहिती – Information About Papaya In Marathi

पपई बद्दल माहिती – Information About Papaya In Marathi पपई म्हणजे चवीला गोड आणि शरीराला पोषक असं फळ आहे. पपई सुद्धा बाकीच्या फळांप्रमाणेच शरीराला पोषक आहे. परंतु पपई हे हिवाळ्यात खाणे सर्वात लाभदायक ठरते. आणि उन्हाळ्यात खाणे हे आपल्या शरीराला धोक्याचे ठरू शकते. कारण पपई शरीराला गरम आहे आणि त्यातल्यात्यात उन्हाळ्यात भर उन्हाच्या हंगामात पपई खाणे यामुळे नक्कीच आपल्या शरीराला याचा त्रास होईल. पण असे नाही कि पपई खाल्ल्याने धोका आहे त्याला खाण्याचा काही कालावधी आहे. चला तर पपई खाण्याचे काही फायदे जाणून घेऊया जे आपल्या आयुष्याला नक्कीच लाभदायक ठरते.

पपई बद्दल माहिती – Information About Papaya In Marathi

Information about papaya

पपई खाण्याचे फायदे..

1) पपई शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते:- पपई मध्ये व्हिटॅमिन आणि फायबर जास्त प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत करण्याचे काम करते. म्हणजेच रक्त वाहिन्यांमध्ये असलेले कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याचे काम करते.रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असल्यामुळे आपल्याला हृदयविकाराची भीती सुद्धा असते. यामुळे पपईच्या सेवनामुळे रक्तवाहिन्या सुरळीत रक्त पुरवठा करतात.

2) वजन कमी करण्यास करते:- पपई खाल्ल्याने वजन सुद्धा कमी होते. ज्या व्यक्तीला आपले वजन कमी करायचे असेल त्यांना त्यांच्या दररोजच्या आहारात पपई खाणे लाभदायक ठरेल. कारण पपई मध्ये कॅलरी ची मात्र ची मात्रा १२० असते. यामुळे जर तुम्ही तुमच्या वजनापासून त्रासून असेल तर त्याच्या वर पपई हा उपाय लाभदायक ठरते.

3) मधुमेहसाठी गुणकारी ठरते तसेच रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढवते:- फळ म्हंटल्या वर त्यात पोषक तत्व आलेच. तसेच पपई मध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा गरजेपेक्षा जास्त असल्याने यामुळे आपली शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. कोणत्याही रोगाशी आपले शरीर चांगल्या प्रकारे लढू शकते. त्याच सोबत पपई हे मधुमेहासाठी सुद्धा गुणकारी आहे. कारण यात गोड चे प्रमाण जास्त असले तरी यामुळे आपल्या रक्तातील साखर वाढत नाही कारण यामध्ये खूप कमी प्रमाणात साखर असते.

4) डोळ्यांचे आरोग्य सुधारते व सांधेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो:- आपणाला माहितच असेल कि पपई मध्ये व्हिटॅमिन च प्रमाण जास्त असते. त्यात पपई मध्ये व्हिटॅमिन ए चा प्रमाण जास्त असल्याने हे आपल्या डोळ्यांना खूप पोषक ठरते. व्हिटॅमिन ए आपल्या वाढत्या वयात होण्याऱ्या डोळ्यांच्या समस्येवर लाभदायक आहे. त्याचसोबत याचा उपयोग सांधेदुखी साठी सुद्धा करतात. कारण त्यात व्हिटॅमिन सी च प्रमाण जास्त असल्याने ते दुखणे कमी करते. यामुळे पपई खाण्याचे खूप फायदे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top