अननस बद्दल माहिती – Information About Pineapple In Marathi

अननस बद्दल माहिती – Information About Pineapple In Marathi अननस हे फळ आपण फार कमी खात असतो. याचे सेवन लोक जास्त प्रमाणात करत नाही. पण या फळाचे आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत. यांच्यात असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आणि फायबर आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या रोगांपासून वाचविण्याचे काम करते. जर आपण याचे नियमित आपल्या रोजच्या आहारात याचा वापर केला तर त्याच्या फायदा आपल्याला नक्कीच दिसून येईल.

अननस बद्दल माहिती – Information About Pineapple In Marathi

Information about pineapple

अननस गोड आणि चवीला थोडं आंबट असते पण त्याचे आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदे होते.आपण सर्वांनी त्याच्या आपल्या आहारात समावेष करायला हवा याच्या समावेशामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होते. अननस आपण कोणत्याही प्रकारे खाऊ किंवा पिऊ शकतो. अननस कापून त्याचे तुकडे करून सुद्धा खाऊ शकतो आणि त्याचा रस सुद्धा बनवू शकतो. अनेक प्रकारच्या आजारांसाठी अननसाचा रस हा पोषक मानला जाते.

प्राचीन काळात ज्यांना पचनाचा त्रास होत असे अशा लोकांना अननस खायला द्यायचे जाच्या सेवनामुळे त्या लोकांचा पचनाचा त्रास कमी व्हायचा. प्राचीन काळात अशा प्रकारच्या समस्यांसाठी अननस खूप मोठा उपाय असे. बाकीच्या कोणत्याही हंगामापेक्षा अननस खाणे आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या हंगामात जास्त फायदेशीर असते. आणि भर उन्हात आपण जर अननसाचा रस पीत असाल त्याचा सुद्धा खूप लाभ आपल्या आरोग्याला होतो.

अननस खायला एकदम आंबट नसून थोडा गोडसर आहे. ज्याचे ज्यूस बनवून पिण्याच्या त्याची चव पुन्हा गोड होते. आपण उन्हाळ्यात अननस खात असेल तर उन्हामुळे आपल्या शरीरात अशक्तपणा आल्याने आपण त्या दरम्यान अननसाचे सेवन केले तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. असे खूप फायदे अननस खाल्ल्याचे आहे. चला तर त्यातील काही फायदे जाणून घेऊयात.

Also Read:  केशर- Saffron Information In Marathi

अननस खाण्याचे फायदे :-Benefits Of Eating Pineapple In Marathi

1) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत :

अननस खाणे आपल्या आरोग्याला त्याचा खूप मोठा फायदा होतो. अननसात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. अननस कापून खाणे किंवा त्याचा ज्यूस बनवून पिणे दोन्ही प्रकार आपल्या शरीराला पोषक ठरतात. ज्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

अननसात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, आणि त्याचसोबत फायबर याचे प्रमाण मुबलक असते. यामुळे याच्या नियमित सेवनामुळे आपले शरीर एखाद्या रोगाशी झुंज देण्यात नेहमी तत्पर असते. याचा अर्थ असाच कि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम अननस करते.त्याचसोबत अननसात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्माणाची मात्रा सुद्धा मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही वायरल प्रकारच्या आजाराचा धोका कमी प्रमाणात असते.

2) संधिवात कमी करते व हाडांसाठी फायदेशीर :

आपण दररोजच्या आहारात अननसाचा वापर केला तर आपल्या हाडाला त्याचा फायदा होतो. याच्या नियमित सेवनामुळे आपले हाड महाभूत होतात. आपल्या हाडाला मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक महत्वाचे आहे. आणि याचे प्रमाण अननसात चांगल्या प्रकारे आहेत.

आपल्या शरीराला गरजेचे तेवढे पोषकत तत्व अननसात आहे. सर्व लोकांना वृद्ध अवस्थेत संधिवाताच्या समस्येतून जावे लागते. यावेळी त्याचा अनेक लोकांना खूप मोठा त्रास होतो. यावेळी त्यांचे सांधे दुखतात. या प्रकारचा संधिवात दूर करण्याचा गुणधर्म अननसात आहे ज्यामुळे ज्यांना संधिवाताचा त्रास असेल अशा लोकांना त्याचा चांगला फायदा होतो.

3) त्वचा सुधारते व अशक्तपणा कमी होते :

अननसात अनेक प्रकारचे पोषक गुण आहेत जे आपल्या शरीराला खूप आवश्यक आणि महत्वाचे आहे. आपल्या शरीराला मजबूत बनविण्यासाठी सर्वात जास्त गरजेचे म्हणजे व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आहे. जे आपल्या शरीरातील अनेक समस्या दुर करतात व आपल्याला असलेला कोणत्याही प्रकारचा त्रास सुद्धा दुर करते. यासाठी अननस मध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन याचे प्रमाण खूप आहे. या घटकांनी अननस हे फळ समृद्ध आहे.

Also Read:  काजू बद्दल माहिती - Information About Nuts In Marathi

आपण अननस खाऊ शकता किंवा त्वचेच्या सुधारणेसाठी त्याला त्वचेवर लावू सुद्धा शकता. आपल्या शरीरावर गाडणार्या सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपला बचाव करते. त्याचसोबत अननसात हिमोग्लोबिन चे प्रमाण सुद्धा मुबलक असते. ज्याचा आपल्या शरीराला मजबूत बनविण्यासाठी वापर करण्यात येतो.


Share: 10

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment