स्ट्राबेरी या फळाबद्दल माहिती – Information About Strawberries In Marathi

स्ट्राबेरी या फळाबद्दल माहिती – Information About Strawberries In Marathi स्ट्राबेरी हे फळ काही भागातच पाहायला मिळते. त्याचा लाल आणि हिरव्या रंगाची फांदी सर्वांना त्याच्याकडे आकर्षित करते. स्ट्राबेरी दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच ते खायला सुद्धा स्वादिष्ट आहे. याचे आपल्या शरीराला खूप प्रमाणात फायदे सुद्धा आहे.साधारणतः स्ट्राबेरी हे फळ लहान मुलांना खूप प्रिय आहे. ते बाकीचे फळ खाण्यासाठी नकार देतील पण स्ट्राबेरी खाण्यासाठी नेहमी तयार असतात.

या अशा सर्वांना आवडणाऱ्या फळात पोषक गुण सुद्धा मुबलक प्रमाणात आहे. जे आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला पोषक आहे. स्ट्राबेरी हे फळ त्याचा लाल गळद रंग आणि त्याच्या मऊशीर भागांसाठी लोकप्रिय आहे. स्ट्राबेरी खाण्यात वेगळीच मजा असते म्हणून खूप लोकांना स्ट्राबेरी आवडते. स्टरबेरीचा वापर खूप प्रकारचे खाण्याचे पदार्थ बनविण्यात सुद्धा केला जाते. किंवा स्ट्राबेरी नुकतीच सुद्धा खातात.

स्ट्राबेरी या फळाबद्दल माहिती – Information About Strawberries In Marathi

Straberry Information In Marathi

बाजारात मानवनिर्मित स्ट्राबेरी सुद्धा मिळते ज्याचा वापर सॅनिटायझर आणि परफ्युम बनविण्यासाठी होतो. स्ट्राबेरीचा शोध 1750 मध्ये फ्रान्स मधील ब्रिटनातं एका जातीच्या रूपात लागला होता.सुरुवातीच्या काळात स्ट्राबेरी सर्वांना नवीन असल्याने लोक याला कमी प्रमाणात खात होते यामुळे याचे उत्पन्न देखील कमी घेण्यात येत होते.त्यानंतर काही काळानंतर यांची आवश्यकता लक्षात घेऊन याचे उत्पन्न मोठया प्रमाणात घेण्यास सुरुवात झाली.

सध्या आपण फळात बघायला गेलं तर स्ट्राबेरी सारखं काहीच नाही आपण याला बघताच याच्या प्रेमात पडतो. स्ट्राबेरी दिसायला खूप गोड आणि सुंदर असते. आणि खायला तर त्याच्याहुनही स्वादिष्ट असते. एक गुलाबी रंगाची एकमेव अशी स्ट्राबेरी आहे ज्याची बी आत नसून बाहेर आहे. आणि ती दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. स्ट्राबेरी खाण्याचे आपल्याला खूप फायदे सुद्धा आहेत.

Also Read:  गाजर - Carrot Information in Marathi

स्ट्राबेरी खाण्याचे फायदे :-

1) शरीरातील चरबी कमी होऊन पचन क्रिया सुधारते :- स्ट्राबेरीत खूप मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. यात फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते यामुळे स्ट्राबेरी आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. स्ट्राबेरीत काही प्रमाणात लाला रंगाचे अँटीऑक्ससईडीस सुद्धा सापडतात. जे आपल्या आरोग्यास नेहमी स्वस्थ ठेवण्यास मदत करतात. याच्या नियमित सेवनामुळे शरीरात असलेली जास्त प्रमाणाची चरबी देखील कमी होते म्हणंजेच आपले वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते.यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुद्धा चांगल्या गतीने होते आणि यामुळे आपल्याला रक्त दाबाची सुद्धा भीती नसते.

2) हृदयाचे आजार कमी होतात व हाडांचे स्वस्थ सुधारते :- स्ट्राबेरीत खूप प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन खूप मोठ्या प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरातील हाडाचे स्वास्थ मजबूत करण्यासाठी खूप आवश्यक आहे. यामुळे आपले हाडं मजबूत गोटात. आणि त्यासंबंधीचा आपल्याला त्रास सुद्धा होत नाही. त्याचसोबत स्ट्राबेरीत काही प्रमाणात फ्लॅवोनाइड सुद्धा असत जे आपल्या हृदय संबंधीचे आजार बरे करण्यास मदत करते. तसेच के लोक त्यांच्या वजनामुळे त्रासून असते त्यांचे वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते.आणि आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्याचं काम करते.

3) संधिवात आणि गाउटसाठी लाभदायक :- स्ट्राबेरीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. जे आपल्या शरीराला खूप आवश्यक आणि लाभदायक असतात. पण त्यात सुद्धा व्हिटॅमिन सी खूप मोठया प्रमाणात आढळते.हे व्हिटॅमिन आपल्या शरीराला हवे त्याहूनही अधिक प्रमाणात आहे. आणि याचे सुद्धा आपल्या शरीराला अधिक प्रमाणात फायदे मिळतात.आपल्या रोजच्या कामामुळे आपण त्रासून असतो आपल्या डोक्यावर ताण असतो अशा तणावपूर्ण स्थितीत आपला रक्तदाब खूप वाढतो त्यावेळी आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम स्ट्राबेरी करते.


Share: 10

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment