सूर्यनमस्कार बद्दल माहिती – Information About Suryanamaskar In Marathi

सूर्यनमस्कार बद्दल माहिती – Information About Suryanamaskar In Marathi सूर्यनमस्कार हा फक्त आपल्या शरीराच्या मजबूतीसाठीच नाही तर यामुळे आपले आरोग्य सुद्धा सुधारते. आणि याचे आपल्याला खूप फायदे आहेत. शरीरातिल खूप प्रकारच्या आजारावर सूर्य नमस्कार हा उपाय आहे.

जर आपण दररोज नियमित सूर्य नमस्कार करत आहात तर यामुळे आपले वजन सुद्धा कमी होते. जे लोकी त्यांच्या वजनामुळे त्रासून आहेत त्यांना त्यांचे वजन कमी करायचे अशा लोकांनी दिवसातून कमीतकमी 10 तरी सूर्य नमस्कार करायला हवं. यामुळे त्याची वजनाची समस्या दूर होईल.

त्याचप्रमाणे आपण सूर्य नमस्कार करत असल्याने आपल्या मनाची एकाग्रता सुद्धा वाढते. आपण नियमित सूर्य नमस्कार करत असाल तर आपण कोणताही परिस्थितीत स्वतःला आवरु शकतो. आपल्या मनाची एकाग्रता वाढल्याने कोणतीही समस्या आपल्याला खूप लहान वाटू लागते आपण आपल्या भूतकाळाबाबत विचार नाही. यामुळे आपल्या कामावर लक्ष सहजपणे लागतं आणि आपण ते काम चांगल पार पाडू शकतो.

सूर्यनमस्कार बद्दल माहिती – Information About Suryanamaskar In Marathi

images 1

 

सूर्य नमस्कार करण्याचे खूप फायदे आहेत जसे सूर्य नमस्कार केल्याने आपल्या शरीराची लवचिकता वाढते, आपल्या त्वचेवर नवा ग्लो येतो, त्यासोबत आपले हाड मजबुत होते आणि पचन शक्ती वाढते. पचन शक्ती वाढल्यामुळे आपले जेवण सुद्धा वाढते आणि शरीराची कसरत झाल्यामुळे भूक सुद्धा चांगली लागते. सूर्य नमस्कार कसाही करणे हे सुद्धा हानिकारक आहे. याची एक प्रक्रिया आहे आणि आपण सूर्य नमस्कार या प्रक्रीयेनुसारच करायला हवा.

आपण अचूक पद्धतीने सूर्य नमस्कार केला तर त्याच्या आपल्या शरीरावर मोठा परिनाम होऊ शकतो. सूर्य नमस्कार म्हणजे याचा सरळ आणि साधा अर्थ आहे, सूर्य नमस्कार म्हणजे सूर्यासाठी केलेली प्रार्थना आपल्यातील खूप लोक सकाळची उठून सूर्य नमस्कार करतात म्हणजेच सूर्याला प्रार्थना करतात आणि त्यानंतरच आपल्या दिवसाची सुरुवात करतात.

Also Read:  खडीसाखरेच्या काही लाभदायक गोष्टी -Some Beneficial Things Of Granulated Sugar In Marathi

काही काळ आधी सर्वच लोक सूर्य नमस्कर नियमितपणे करायचे ते लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात सूर्य नमस्कार पासूनच करायचे. आणि हेच ते कारण कि त्यांचे आरोग्य नेहमी तंदुरुस्त असायचे कारण ते नियमित व्यायाम आणि सूर्य नमस्कार करायचे. सूर्य नमस्कार करण्याचे खूप फायदे आहेत त्यातीलआतड्यांशी च काही फायदे आपण जाणून घेऊयात.

सूर्य नमस्कार करण्याचे फायदे..

1) शरीराचे आरोग्य सुधारते :- सूर्य नमस्कार करताना आपल्या शरीराची लवचिकता वाढते. आपण नियमित कसरत केल्याने आपल्याला भूक सुद्धा लागते. आणि पचन सुद्धा चांगल्या रीतीने होते. सूर्य नमस्कार या योगात एक योग्य नसून पूर्णतः 12 योग्य करावे लागतात. आणि यात 12 प्रकारचे योगासने करताना आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम पडतो.त्याचसोबत योगासन करताना योगाच्या प्रत्येक भागावर आपल्याला नियमित श्वास घ्यावा लागतो यामुळे आपल्या आतड्यांची सुद्धा चांगल्या प्रमाणे कसरत होते.

आतड्याच्या कार्यासाठी सूर्य नमस्कार करण्याचा चांगला परिणाम होतो. यामुळे आपल्या शरीरातील रक्तपुरवठा सुद्धा सुरळीत होतो. आणि यामुळे आपल्याला कोणत्याही आजाराची शक्यता कमी असते.

2) वजन कमी व श्वसनात सुधारणा :- आपण सूर्य नमस्कार करताना शरीराच्या प्रत्येक भागावर त्याचा परिणाम पडतो. आणि यामुळे आपले सर्वच अवयव त्याच कामात असतात. काही पातळीच्या शोधामुळे असे समजण्यात आले कि, सूर्य नमस्कार करताना स्वास्थ आणि श्वसनासंबंधीचे आजार दूर होतात.

त्याचसोबत सूर्य नमस्कार करताना आपल्या शरीराची चांगलीच कसरत होते आणि यामुळे आपले वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते.पण यात सर्वात मोठे काम म्हणजे सूर्य नमस्कार नियमित आणि योग्य पद्धतीने करायला हवा ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचसोबत आपल्या श्वसनाचा परस्पर संबंध आपल्या आतड्यांशी असतो. आणि सूर्य नमस्कार करण्यात आपले आतडे सुद्धा सहभागी होतात. यामुळे आपल्या श्वसनाची सुद्धा समस्या दूर होते.

3) तणावमुक्ती व मांसपेशींवर सुधारणा :- सूर्य नमस्कार करताना त्याच्या अनेक प्रकाराद्वारे आपल्या शरीराला मजबूती मिळते. शरीराच्या मासपेशींमध्ये देखील सुधारणा आण्याचे काम सूर्य नमस्कार करते. सूर्य नमस्कारचा संपूर्ण प्रभाव आपल्या शरीराच्या अनेक भागांवर पडतो.

Also Read:  आधार PVC कार्ड म्हणजे काय ? What is Aadhaar PVC Card In Marathi?

सूर्य नमस्कार केल्याने आपल्या मनावर सुद्धा याचा चांगलाच परिणाम होतो. आपली एकाग्रता वाढते कोणत्याही गोष्टी बाबत आपली विचारशक्ती वाढते. आपण आपल्या मनाला स्थिर करू शकतो. कोणत्याही परिस्थिती आपण आपल्याला सहजपणे आवरू शकतो. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा तणाव खूप कमी होतो. खूप लोक दिवसभर काम करून त्यांना त्या कामाबद्दल तणाव असतेच अशा लोकांनी थोडा वेळ काढून सकाळी सूर्य नमस्कार करायला हवा. त्याचा त्यांच्या मनावर नक्कीच चांगला परिणाम होईल.


Share: 10

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment