आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक-International Space Station In Marathi

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक-International Space Station In Marathi आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे एक अंतराळात बांधले गेलेले संशॊधन केंद्र आहे.या स्थानकाला बांधण्यासाठी खूप वर्षे लागलीत.या स्थानकाचे बांधकाम 1998 मध्ये सुरु झाले होते.

1998 मध्ये पाठवलेले हे स्थानक 2011 पर्यंत पूर्णपणे कामात येऊ लागले.आत्तापर्यंतचे अंतराळात पाठवलेले सर्वात मोठे अंतराळ स्थानक आहे.याच्या बाबत म्हणतात कि हे स्थानक एक फुटबॉल मैदानापेक्षाही मोठे आहेत.या स्थानकाची वेग खूप आहे.आपण ते जाणण्याचा प्रयत्न केला तर हे स्थानक तासाला 27724 किमी इतक्या वेगाने आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक-International Space Station In Marathi

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे एक उपग्रह आहे पण बाकीच्या सर्व उपग्रहाच्या बाबतीत हे उपग्रह सर्वात मोठा आहे.या मोहिमेसाठी एकूण 16 देश एकत्र आले होते.यामध्ये अमेरिका,रशिया, कॅनडा, जपान यांच्या सोबत 10 युरोपियन देश यांचा समावेश होता.

हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 350 किमी इतक्या अंतरावर आहे.हा एक मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह आहे.याच्या बांधणीत रशिया आणि अमेरिकेचा समावेश असल्याने या उपग्रहाचे दोन भाग करण्यात आले आहे.ज्यात पहिला भाग रशियन ऑर्बिटल सेगमेंट आणि दुसरा भाग युनायटेड ऑर्बिटल सेगमेंट अशा दोन भागात विभागले आहे.

या उपग्रहाचे क्षेत्रफळ बाघितले असता 336 फूट रुंद आणि 240 फूट लांब इतका आहे.या उपग्रहात एकावेळी 6 व्यक्ती राहू शकतात.2 नोव्हेंबर 2000 पासून हा उपग्रह सलग 21 वर्षे अंतराळवीरांच्या सेवेत कार्यरत आहे.

उपग्रहाचा कार्यकाळ 2028 पर्यंत राहू शकते असा अंदाज बांधला आहे.या स्थानकाची बांधणी हे अवकाशातच करण्यात आली.वेगवेगळ्या प्रमाणे वेगवेगळ्या यानाने याला लागणारे वस्तू हे अंतराळवीर घेऊन गेले आहेत.आणि त्यांनीच ते मुख्य स्थानकाला जोडून त्याचे काम सुरु केले.

या स्थानकाचा काही प्रयोग करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो कारण पृथ्वीवर असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कारणाने काही प्रयोग असे आहेत कि शास्त्रज्ञ ते प्रयोग पृथ्वीवर करू शकत नाही.त्यामुळे ते प्रयोग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात केले जाते.यासाठी सुद्धा त्याच्या वापर केला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top