कोंबडी आणि कोल्हा-Kombdi Ani Kolha Story In Marathi

कोंबडी आणि कोल्हा-Kombdi Ani Kolha Story In Marathi एक कोल्हा एका खोपट्यात शिरून काही तरी खायला मिळते का ते शोधात होता. तेवढयात त्याची नजर मळ्यावर बसलेल्या कोंबडी वर पडली. पण ती माळ्यावर असल्यामुळे कोल्ह्याला तिथे जात येईना.

कोंबडी आणि कोल्हा-Kombdi Ani Kolha Story In Marathi

कोंबडी आणि कोल्हा

 

तिला युक्तीने खाली आणून मारून खावी. या हेतूने कोल्हा तिला म्हणाला,’कोंबडी ताई तू कशी आहेस? तू बरेच दिवस आजारी आहेस असं कळलं. आता कशी आहेस? तुझी चोकशी करावी म्हणून आलो आहे.

आता एक काम कर तू खाली ये मला नाळीपरीक्षा करता येते. तुझी नाळी पाहतो म्हणजे तुला औषध देता येईल. तुझी हि अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय.’ अशीच स्तुती तो काहींतरीवेळ करत राहिला. पण कोंबडी मोठी चालक ती म्हणाली,”खरंच भाऊ तू माझ्याविषयी दाखवलेली आस्था पाहून मला खूप गहिवरून आल आहे.

पण काय करू मला खाली उतरायला वैदयांनी मनाई केली आहे. कारण मला इतका अशक्त पण आला आहे, की मी जर खाली उतरले तर माझा जीव जाईल, असे ते म्हणाले. तेव्हा माझा नाईलाज आहे. रागावू नकोस. तू मला बरं करशील यावर माझा विश्वास आहे, पण वैद्यांचाही हातगुण चांगला आहे, शिवाय त्यांना जर मी तुझ्याकडून औषध घेतलं असं कळालं , तर ते रागावतील.

त्यांचा अपमान करायची माझी इच्छा नाही. तेव्हा कोल्हे भाऊ मला उलट तुझे स्वागत करता येत नाही याच वाईट वाटतंय. तूच उलट रागावू नकोस. ‘कोळ्याचा नाईलाज झाला कोंबडीचे बोलणे त्याने ऐकले आणि तो मनातले मांडे मनात ठेऊन निघून गेला.

तात्पर्य;- दक्षता कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत करते.

Also Read:  स्वाभिमान- Swabhiman Story In Marathi

Share: 10

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment