लक्ष्य – Laksh Story In Marathi

लक्ष्य – Laksh Story In Marathi एकदा गरुडाचं पिल्लू उत्साहाच्या भरात सगळ्यांना आपल्या उडण्याचा कौशल्य दाखवत होत. एकदा उडत उडत त्याला जमिनीवरून एक डुक्कर जाताना दिसलं. त्या डुकराचं मास खाऊश्या त्याला वाटलं. तो म्हणाला आई ते बघ किती छान डुक्कर आहे.”हा मी पकडू का? खायला किती छान लागेल ना.” त्यावर आई म्हणाली “तू सध्या लहान आहेस, तू आधी उंदराला पकडला शिक”. गरुडाचा पिल्लू आज्ञाधारक होत. त्यानं त्याच आई च ऐकलं आणि लवकरच तो उंदीर पकडायला तरबेज झाला.

लक्ष्य – Laksh Story In Marathi

लक्ष्य

काही दिवसाने गरुडाच्या पिल्लाने पुन्हा आई ला विचारलं, “आई मी आता उंदीर पकडायला शिकलोय मी आता डुक्कर पकडू का”? त्यावर त्याची आई म्हणाली, “अजून नको, तू आधी सश्याला पकडून दाखव”. त्यावर पुल्लू म्हणाल, “ठीक आहे”. त्यानंतर पिल्लाने त्याचा शोध सुरु केला. आणि काही दिवसातच तो ससा पकडायला शिकला. आणि पुन्हा काही दिवसातच त्याने त्याच्या आई ला विचारले.”आई आता मी डुक्कर पकडू का”? त्यावर गरुड आई म्हणाली,” तू आता बकरीचा पिल्लू पकडून दाखव. पिल्लू म्हणाल,” ठीक आहे”.

त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केली. आणि काही तटाने कोकडु पकडून दाखवलं. गरुडाच्या पिल्लाच्या आता ताकद आली होती. ते मोठं झालं होत. त्याच्या पंखांमध्ये आणि चोचीमध्ये बळ आलं होत. आणि त्याच्यात आत्मविश्वासही दिसत होता. एके दिवशी गरुड आई आणि ते पिल्लू एका फांदीवर बसलेले होते. एक डुकराचं पिल्लू जमिनीवरून जात होत. पिल्लाने त्याच्या आईकडे बघितलं. मग त्याच्या आईने त्याला इशारा केला. गरुडाच्या पिल्लाने आत्मविश्वासाने झेप घेतली. आणि एक झापतेत ते डुकराचं पिल्लू उचलला आणि उंच नेऊन त्याचा फडश्या पडला.

गरुडाचं पिल्लाला त्याचा आनंद वाटत होता. त्याचा उत्साह आणि आत्मविश्वास गगनात मावत नव्हता. मित्रांनो जर गरुडाच्या आईने जर पहिल्यांदाच डुक्कर पकडायला हो म्हंटल असत तर तो अपयशी झाला असता त्यामुळे त्याचाच आत्मविश्वासही खचला असता. त्यामुळे तो पुढे शिकार करण्यातच घाबरला असता. म्हणून गरुड आईने त्याच्या आवाक्यात असलेल्या लहान उंदरापासून सुरुवात करायला सांगितली.आणि मग शेवटी त्याला डुक्कर पकडायला सांगितल आणि मग ज्यात तो सहज यशस्वी झाला.

Also Read:  महत्वाचा दगड- Mahatwacha Dagad Story In Marathi

तात्पर्य :-मित्रांनो आपणही आपलं लक्ष्य मोठं ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी सुरुवात ही लहान कामापासून केली पाहिजे. आणि जर आपण असं केलं तर आपल्याला धोका राहील आणि आपण त्या कामात नक्कीच यशस्वी होऊ.

Akshay

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *