लिंबू- Lemon Information In Marathi

लिंबू- Lemon Information In Marathi प्रत्येक देशात लिंबूचा खाण्यासाठी वापर करतात. काही वेळी डॉक्टर सुद्धा लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात लिंबूपाणी पिऊन करायला सांगतात. कारण लिंबू आपल्या शरीराला एनर्जी देते. आपण सुद्धा आपल्या दररोजच्या आहारात लिंबूचा वापर करतो.

कोणत्याही पाण्यासोबत आपण लिंबूचे सेवन करू शकतो.लिंबू आपल्या शरीरासाठी थंड असते. या कारणानेच उन्हाळ्यात सर्वजण लिंबू पाणी पितात. लिंबू खूप प्रकारच्या औषधींचे काम करते. खूप बिमाऱ्यांवर लिंबू हा उपाय आहे.

लिंबू- Lemon Information In Marathi

Lemon information in marathi

लिंबूत खूप प्रकारचे औषध गुण आहे. नित्य नियमाने लिंबूचे सेवन आपल्या आरोग्यामध्ये सुधार आणते. जर एखाद्याला अपचन झाले असता आपण त्याला लिंबूपाणी पाजायला हवं. लिंबू पचनक्रिया सुद्धा सुरळीत ठेवते. खूप प्रकारचे लोक लिंबूचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन करतात.

लिंबूचे सेवन सर्वात जास्त पोटासाठी लाभदायक आहे.आपल्या शरीरातील भागामध्ये लिंबूच्या सेवनामुळे सर्वात जास्त पोटासंबंधी समस्या सुटतात. लिंबू खाण्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत.

लिंबू खाण्याचे काही फायदे..

१) सर्दी खोकल्यापासून बचाव होतो:- कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पिण्यास आपल्याला त्याचा नक्कीच लाभ मिळतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण दररोज याप्रकारचे पेय पिले तरआपल्या आरोग्यावर याचा खूप फायदा दिसून येईल. आणि त्याचसोबत आपले सर्दी आणि खॊकला अश्या प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते.

आपल्या शरीरासाठी सायट्रिक ऍसिड लाभदायक आहे. लिंबूमध्ये हा घटक मुबलक प्रमाणात आहे, ज्यामुळे आपले आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते.

२) मुतखड्याची समस्या आणि तोंडात सतत लाळ निर्माण करते:- जे लोक मुतखड्यापासून त्रासून असतात त्या लोकांना लिंबू हा लाभदायक ठरतो. डॉक्टर सुद्धा अशा लोकांना दररोज उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून खाण्यास सांगतात. ज्यामुळे मुतखड्याची समस्या दुर होते.लिंबू मधील पोषक तत्व आपल्या शरीरातील मुतखड्याची समस्या वाढू देत नाही त्यावर नियंत्रण ठेवते. आणि मुतखड्याचा पेशींना वाढण्याची संधीच देत नाही.

त्याचसोबत ज्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता असते यामुळे अशा लोकांचे तोंड सतत कोरडे होत असते. यामुळेच त्यांना सतत तहान लागणे व लघवीला सुद्धा होणे अशा समस्या होतात. या लोकानीं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या दररोजच्या आहारात भाजी किंवा कोणत्याही पदार्थात लिंबू पिळून खाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला अश्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top