महत्वाचा दगड- Mahatwacha Dagad Story In Marathi

महत्वाचा दगड- Mahatwacha Dagad Story In Marathi दहावीचा वर्ग विद्यार्थ्यांनी भरलेला होता. विद्यार्थ्यंच्या भविष्यातील योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उचित मार्ग निवडण्यास मदत करण्यासाठी आज मुख्याध्यापकांनी त्यांच्या बरोबर बैठक घ्यायचं ठरवलं होत.महिन्याभारतच बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार होत्या. या नविण वाटचालीस मुले खूप उत्सुक होती. त्यांच्या मनामध्ये भविष्यासाठी खूप कुतूहल हि होत.

महत्वाचा दगड- Mahatwacha Dagad Story In Marathi

महत्वाचा दगड

 

थोड्यावेळातच काही गोष्टी घेऊन एक शिपाई वर्गात आला. मागोमाग मुख्याध्यापकही आले. सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यांनी एक मोठी रिकामी काचेची भरणी टेबलावर ठेवली. आणि त्यात दगडाचे मोठे तुकडे भरायला. सुरुवात केली. मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले,’भरणी भरली आहे का”? सर्वांनी’हो’ असे उत्तर दिले. मग त्यांनी लहान खडे भरलेला डब्बा घेतला आणि बरणीत भरायला सुरुवात केली.

भरणी थोडीशी हलवल्या नंतर ते खडे दगडामध्ये स्तिरावले. पुन्हा एकदा त्यांनी विद्यार्थ्यंना “भरली भरली आहे का?” असे विचारले. सर्वांनी होकार दिला. मग त्यांनी रेतीचा डब्बा काढला आणि त्यात भरलेली रेती त्या भारणीत टाकायला सुरुवात केली. रेतीने दगड आणि खड्ड्यांमध्ये उरलेली जागा भरली. पुन्हा त्यांनी तेच विचारले. तेव्हाही सर्वांनी होकार दिला. मग मुख्याद्यापकांनी समजावून सांगितले. “बाळांनो, ही भरणी तुमच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करत आहे, हे तुम्ही समजून घावे. असे मला वाटते.

मोठे दगड म्हणजे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी जसे तूच कुटुंब, तुमचे शिक्षण, तुमचे आरोग्य, इत्यादी. हे  इतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्यामध्ये तुमची नोकरी, परदेशात शिक्षणासाठी किव्हा नोकरीसाठी जाणे, घर, इत्यादी.आणि हि रेती इतर सर्व सोयीस्कर गोष्टी दर्शवते. जर तुम्ही भरणी आधी रेतीने भरली तर मग खडे आणि दगडांसाठी तिथे जागा उरली नसती. तुमच्या आयुष्यात असच घडत.

जर तुम्ही तुमचा सगळा वेळ आणि शक्ती छोटी छोट्या गोष्टीत घालवलीत तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी कधीच वेळ भेटणार नाही. ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहे. त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा जे तुमच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. प्रथम दगडांवर लक्ष क्रँद्रित करा. तुमचे प्राधान्य निश्चित करा, बाकी फक्त रेती आहे. विद्याथ्यांनी टाळ्या वाजवल्या. मुख्याध्यापकानीं दिलेल्या उदाहरणामुळे मुले आनंदी झाली.

तात्पर्य:- आपण तेच काम केले पाहिजे जे आपल्याला खरंच समोर घेऊन जाणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top