मानवता हाच धर्म-Manwata Hach Dharm Story In Marathi

मानवता हाच धर्म-Manwata Hach Dharm Story In Marathi डीन जोन्स एका  हॊटेलमध्ये चौकीदाराचं काम करत होता आणि तिथेच राहातेही होता. एका रात्री मुसळधार पावसात भिजून चिंब झालेले नवरा बायकोचे जोडपे हॉटेलच्याबी दाराशी आले आणि खोली मागू लागले डीन जोन्स म्हणाला”माफ करा एकही खोली खाली नाही” यावर ते म्हणाले, “आम्ही आता या पावसात कुठे जायचं? काय करावं समजत नाही.

जोन्स विचार करू लागला, तो म्हणाला आपल्याला पाहिजे तर माझ्या खोलीत रात्र घालवता येईल पण खोली मात्र खूपच सामान्य आहे’ ” “तू कुठे झोपणार? त्यांनी विचारलं “त्याची काळजी करू नका मी टेबलावर रात्र घालविणे.” ते दोघे त्या रात्री तिथेच राहिले.

मानवता हाच धर्म-Manwata Hach Dharm Story In Marathi

मानवता हाच धर्म

 

काही दिवसानानंतर जोनस ला एक लिफाफा मिळाला त्यात न्यूयॉर्कच्या पत्ता आणि तिकीट होतं . जोन्स तिथे गेला. त्या जोडप्याने मोठं हॉटेल बांधलं होतं . त्याच चांगला स्वागत झालं . त्यांनी त्याला हॉटेलचं मॅनेजर करायचं ठरवलं. जोन्स म्हणाला, “माझी योग्यता नाही मॅनेजर होण्याची.” ते दोघेही म्हणाले, “तुझी योग्यता आम्ही त्याच रात्री पहिली.

तुझ्या रोमारोमात मानवता भरली आहे. हे आम्ही लगेच ओळखलं. त्या रात्री तू जर आम्हाला आसरा दिला नसता तर?.. तेव्हा तुझ्या योग्यतेचा मोबदला आम्ही देत आहोत.

तात्पर्य:- अंगी मानवता बाळगावी.

Also Read:  विदूषकाचा धडा- Vidrushakacha Dhada Story In Marathi

Akshay

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *