ध्यान – Meditation Information In Marathi

ध्यान – Meditation Information In Marathi आपल्याला सर्वांचं वाटते कि आपण सुद्धा आनंदी असावं, आपले मन शांत असावं. त्यासाठी आपल्याला ध्यान करावे लागते नियमित व्यायाम करावं लागते. ध्यान केल्यानं खूप मोठ्या प्रमाणात फायदे मिळते.

ध्यान – Meditation Information In Marathi

ध्यान केल्याने आपले शरीर आणि मन यांना असंख्य असे फायदे आहेत. ध्यान केल्याने आपली एकाग्रता वाढते. आपण करत असलेल्या एखाद्या कामात आपण पूर्णपणे आपले लक्ष देऊ शकते. सध्या प्रत्येक व्यक्तीला तणाव आहे, प्रत्येक वयोगटाच्या लोकांना तणावाचा सामना करावा लागतो. जर आपण नियमित ध्यान केले तर ध्यान हा यावर सुद्धा उपाय आहे. ध्यान केल्याने आपले मन आनंदी असते.

आपण जर दररोज ध्यान करत असाल तर तुमच्या शरीरात नक्कीच त्याच्या बदल दिसून येईल.जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात प्राणशक्ती भरते. आणि हेच त्याचे कारण कि आपले मन शान्त आणि आनंदी असते. कोणतेही काम करण्यात आपल्याला उत्साह वाटतो. ध्यानामुळे केवळ शरीरिक पातळीवरच नाही तर मानसिक पातळीवर सुद्धा त्याचा लाभ होतो.

ध्यानमळे आपल्या मेंदूची विचारशक्ती वाढते. आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.यामुळे आपण आपले मन स्तिर ठेऊ शकतो.आपण कोणत्याही समस्यांचा सामना करू शकतो, त्याविषयी आपल्याला भीती वाटतं नाही. आपल्या मनाची एकाग्रता वाढते. आणि मनाची विचारशक्ती मोठया प्रमाणात वाढत. ध्यानाचे कोणतेही फायदे घेण्यासाठी तुम्हाला दररोज नियमित ध्यान करणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. चला तर जाणून घेऊ ध्यानाचे काही फायदे.

ध्यान करण्याचे फायदे..

१) चांगला संवाद व भावनात्मक स्थिरता :-

ध्यान केल्याने आपले मन स्थिर होते आणि आंतरिक शुद्धी वाढते. त्याचसोबत मानसिक स्तरावर सुद्धा पोषण मिळते. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीविषयी खूप बोलत असतो आणि आपल्या सोबत असलेले सर्व लोक आपल्यालकडे बघत असतात आणि आपल्या भावना उफाळून येते त्यावेळी आपल्याला आपले मन अस्थिर असल्याचे जाणवते. आणि आपण एकाएकी शांत होतो. अशा वेळी आपले मन आवरण्याची आणि स्थिर ठेवण्याची शक्ती ध्यान देते.

२) आत्मविश्वास वाढतो व संवाद सुधारते :-

जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नियमितपणे ध्यान केले तर आपल्या मनाचा विकास होतो. यामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. एखाद्या गोष्टीविषयी विचार करण्याची शक्ती वाढते. कोणत्याही परिस्थिती आपण आपल्या मनाला आवर घालू शकतो.यामुळे आपल्या बुद्धीचा देखील विकास होतो.

आपला आत्मविश्वास वाढल्याने आपल्या मनातील निराशेची भावना व राग अशा गोष्टी आपल्याला खूप लहान वाटायला लागतात. आपण यावर जास्त लक्ष देत नाही.यामुळे आपण आपल्या वर्तमान आयुष्यात जास्त लक्ष देत असतो. भूतकाळातील गोष्टींकडे आपण जास्त प्रमाणात लक्ष देत नाही.

३) आपल्या वैयक्तिक जीवनात परिवर्तन होतो :-

ध्यान केल्यामुळे आपले मन स्थिर होते आपल्या मनाची विचार करण्याची शक्ती वाढते. आणि आपण आपल्या कामावर जास्त लक्ष देत असतो बाकीचे आपल्या विषयी काय विचार करते याबाबत आपण कधीच विचार करत नाही.आपण प्रत्येक गोष्टी समजू शकतो त्याबद्दल विचार करू शकतो.

आपल्यावर एखादी समस्या असेल तर आपल्या त्याचा विचार करून त्याच्यातून बाहेर निघण्याचा विचार करू शकतो. आपण एखादे काम करण्यास खूप रस आणि आवड दाखवत असतो. त्याकामाबद्दल आपल्याला आपल्याला रस वाटू लागतो. आणि आपण कोणतेही काम पूर्णपणे मन लावून केले तर त्यात कोणतीही अडचण येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top