नवीन नातं- Navin Nat Story In Marathi एक गावच्या एक शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिका, आशा मॅडम ची बदली झाली. मुली फार नाराज झाल्या. आशा मॅडम त्यांच्या लाडक्या होत्या. उत्तम शिकवणाऱ्या होत्या. त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही असे मुलींचं मत होतं . म्हणून शोभा नावाच्या नव्या मॅडम जेव्हा इंग्रजी शिकवायला आपल्या तेव्हा वर्गाने त्यांचे स्वागत केलेच नाही. जणू आधिच्या मॅडम शाळेतून गेल्या हा नव्या मॅडमचा गुन्हा. नव्या मॅडम समजूतदार होत्या, प्रेमळ होत्या.
मुलींना समजावून घेऊन त्यांच्या जवळ जाण्याचा त्यांनी मना पासून प्रयत्न केला, पण व्यर्थ. पंधरा दिवस तरी शियुद्ध चालूच. मुली फक्त बसायच्या, उत्तरे द्याच्या नाहीत. संपूर्ण असहकार. या चळवळीची नेता होती वर्गातील सर्वात हुशार मुलगी विजया. विजया खेड्यातून शिकायला आलेली बुद्धिमान व संवेदन शील मुलगी. पूर्वीच्या शिक्षके विषयाचे तिचे प्रेम, नव्या शिक्षके विषयाच्या रागात रूपांतर झाले होते.
एक दिवस मॅडमनी एक इंग्रजी कविता शिकवली. आणि त्याचा अर्थ विचारला नो नेमका विजयाला. ‘ऑल दैत ग्लिटर्ज इज नॉट गोल्ड् ‘. अर्थात कोणतीही चमकणारी वस्तू सोनं नसतं. असा त्याचा अर्थ. विजयाला संधी मिळाली. तिने कुचकट उत्तर दिले. ‘इंग्रजी शिकवणारी कुठलीही मॅडम आशा मॅडम नसते”. सगळा वर्ग या घोषणांनी दम दमून गेला. आधीच ओशाळ्या झालेल्या मॅडमच्या सहनशक्तीचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या झटपट्याने वर्गाच्या बाहेर गेल्या.
आता मॅडम प्राचार्यांकडे तक्रार करणार आणि आपापल्या बोलावणे येणार असे विजयाला वाटले. शाळा सुटली. मुली घरी परतल्या. वस्तीगृहावर राहणारी विजया परत आली पण तिचे मन तिला खात राहिले, आपण केले ते वाईट केले या जाणिवेने तिला एवढा ,मनस्ताप झाला कि ताप भरला, प्रचंड ताप. त्या तापाच्या गुंतीतून शुद्धीवर येऊन तिने डोळे उघडले. तेव्हा शोभा मॅडम तिच्या शेजारी हात हातात घेऊन बसल्या होत्या. त्यांना पाहून तिला प्रचंड रडू कोसळले आणि त्या रडण्यात मनातली सारी कटुता वाहून गेली. तिला मॅडमच्या रूपात तिची आई दिसू लागली. त्या दोघीत एक नव्या नात्याचा जन्म झाला.
तात्पर्य:- आयुष्यात कधी कधी असे घडते कि ज्यांना आपण विनाकारण नापसंत करतो ते आपले प्रेरणा स्रोत, आपले आदर्श बनून जातात.