मोरांची शेती-Peacock farming In Marathi शेती हा प्रकार तर आपण सर्वांना माहिती आहे. कारण आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आणि आपल्या देशात शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शेती हा प्रकार आपल्याला ओळखीचाच आहे. त्यात मोरांची शेती हे जरा वेगळाच आहे.
मोरांची शेती-Peacock farming In Marathi
बांगलादेश मध्ये राहणाऱ्या एका मुलाचे नाव मोहम्मद शाह अली आहे. हा बांगलादेशीय तरुण चक्क मोराची शेती करतोय . तो म्हणतो मोरांचा पालन करणं हा त्याचा छंद आहे. तो त्याचा अनुभव सांगताना म्हणतो कि, 2019 त्याने एक मोरांची जोडी विकत घेतली होती.
त्या जोडोनि 12 पिलांना जन्म दिला त्यानंतर त्याने 5 मोर विकत घेतले. त्यानंतर त्यांना अनेक पिल्लं झाली. आणि असेच करताना शाह अली यांच्या शेतात सध्याच्या काळात 100 मोर आहेत. त्यांनी याच्या मागे साधारण 8 लाख 80 हजार रुपये खर्च कलेत. आणि त्या मोबदल्यात त्यांनी कोटींचा मोबदला मिळवलाय.
मोरांची किंमत हे त्यांच्या सौंदर्यावरून ठरवल्या जाते. मोराच्या एक जोडीची किंमत सुमारे 88 हजार रुपये इतकी आहे. श्रीमंत लोक ही मोर विकत घेतात. शाह आली यांच्या घरी असलेल्या आर्थिक अडचणींमुळे शाह अली यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही.
त्यानंतर त्यांनी बचत केलेल्या पैश्यामहून हा व्यवसाय सुरु केला. ते म्हणतात कि त्यांनी कष्टाने 10 हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्या पैश्यातून त्यांनी एक नर मोर विकत घेतला. तो मोठा झाला आणि त्यानंतर त्याला विकलं आणि त्या पैश्यातून एक मादी मोर विकत घेतली. ती मोठी झाल्यावर तिने आणखी पिलांना जन्म दिला. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचा हा व्यवसाय सुरूच ठेवला.