भारतीय रिझर्व बँक-Reserve Bank of India Information In Marathi भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वात मोठी आणि महत्वाची बँक आहे. भारतातील बाकी सर्व बँक या बँकेच्या हद्दीमध्ये काम करतात. भारताचे चलन छापणे तसेच भारतातील सर्व आर्थिक कामे हे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखेखाली होतात.
भारताने स्थापन केलेली भारतीय रिझर्व्ह बँक ही एक नियात्मक संस्था आहे. या बँकेची स्थापना ही इसवी सण 1935 मध्ये करण्यात आली. ज्या काळात भारतात इंग्रज राज्य करत होते त्याच काळात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई या शहरात आहे.
भारतीय रिझर्व बँक-Reserve Bank of India Information In Marathi
भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची कामे भारतीय रुप्याचे चलन पुरवणे व बँकिंग प्रनलाईचे जतन करणे आहे. देशातील सर्व आर्थिक कामे याच बँकेच्या देखरेखेखाली होतात. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक हे भारताच्या आर्थिक विकासाला सुद्धा चालना देते.
भारतीय रुझर्व बँकेचे प्रत्येक वेगळ्या कामासाठी वेगवेगळी संस्था आहे. जसे रिझर्व्ह बँकेने पेमेंट आणि सेटलमेंट या सिस्टम चे पालन करण्यासाठी पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया ची स्थापना केली. देशात नोट छापणी होताना त्याची सर्व जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेवर असते.
बँकेची स्थापना झाल्यानंतर 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार त्याचे कामकाज सूरु करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्पूर्वी काळात भारतीय रिझर्व्ह बॅंकचे कामकाज इंग्रजांच्या देखरेखेखाली होत होते. त्यानंतर 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. भारतीय चलन छापताना त्या नोटा भारतीय चलनात स्वीकारण्यासाठी त्यावर भारतीय रिझर्व बँकेचे सर्वोच्च अधिकारी म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर त्यावर एक वाचन नाव लिहितात आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी सुद्धा करतात.
भारताच्या स्वातंत्रपूर्व काळात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गर्व्हनर हे ऑसबोर्न स्मिथ हे होते. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेनंतर एप्रिल 1935 मध्ये त्यांच्या कारभार स्वीकारला. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे मूळ रहिवासी आणि गव्हर्नर म्ह्णून सर चिंतामण द्वारकानाथ यांनी त्यांचा कार्यभार 1943 रोजी स्वीकारला. ते भारतीय मूळ रहिवासींचे व भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते.
त्या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून सुद्धा कामकाज सांभाळले. भारताच्या इतिहासात डॉ. मनमोहन सिंग हे एकमेव असे व्यक्ती आहे ज्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद सांभाळल्यानंतर भारताचे पंतप्रधान पद सुद्धा सांभाळले.