जगातील तापमानात वाढ-Rising Global Temperatures In Marathi आपण सतत बहत असतो कि काही काळ झाला आपल्या परिसरातील तापमानात खूप मोठा प्रमाणात वाढ होत आहे. त्याच प्रमाणे प्रदूषण सुद्धा मोठा प्रमाणात होत आहे. आणि या वाढत्या तापमानामुळे खूप लोकांना त्याचा त्रास होत आहे. या वाढत्या तापमानामुळे येणाऱ्या काळात खूप मोठ्या समस्या मानव जीवनावर येण्याची शक्यता शास्त्रज्ञ सांगत आहे.
त्यात काही लोकांना पाण्याच्या तुटवड्याचा देखील सामना करावा लागेल. पाण्याची कमतरता असल्यामुळे आपल्या दररोजच्या जीवनात सुद्धा खूप प्रकारच्या समस्या निर्माण होईल. पाण्याची कमतरता असल्यामुळे शेती व्यवसायात सुद्धा खूप मोठा प्रमाणात त्याचे नुकसान आपल्याला बघायला मिळणार. या वाढत्या तापमानामुळे आपल्यावर नैसर्गिक आपत्तीचे खूप मोठा प्रमाणात धोका निर्मण होईल.
त्यात आपल्याला दुष्काळ, पूर, वादळ,त्याचसोबत उष्ण वाऱ्यांच्या सामना करावा लागेल. यामुळे येणाऱ्या काळात या द्वारे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सुद्धा मोठा प्रमाण वाढणार.येणाऱ्या काळात तापमानात सतत वाढ होत असेल तर त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात दुष्काळ पडण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असेल.
जगातील तापमानात वाढ-Rising Global Temperatures In Marathi
सतत तापमानात वाढ होत असल्याने काही जागी असलेले बर्फाळ प्रदेश त्याठिकणीचा बर्फ वितळून त्याचे रूपांतर पाण्यात होईल आणि पाण्याची पातळी वाढेल त्याचा कारणाने समुद्रात पाण्याची पातळी वाढेल आणि कोणत्याही परिस्थितीत पुराची स्थिती निर्माण होईल.
वातावरणात तापमान खूप जलद गतीने वाढत असेल तर त्याचा आपल्या सजीव सृष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होईल. यामुळे वातावरणातील अनेक पशु पक्ष्यांना त्याचा त्रास होईल आणि त्यातील काही पशु पक्षी यांची प्रजाती नष्ट सुद्धा होईल. तपणामामुळे दूषित पाण्याची पातळी सुद्धा वाढणार. त्यामुळे अनेक प्रकारच्या नवीन आजारांची उत्पत्ती होईल. आणि अशा पाण्याच्या सेवनामुळे नवजात शिशुंना त्याचा खूप मोठा फटका बसणार जास्त प्रमाणात शिशु कुपोषित होणार.
या कुपोषणाच्या समस्यांनी अनेक बाळांची बळी जाण्याची शक्यता जाणविली जात आहे. तापमान वाढल्याने तापमानात कार्बन डायऑक्ससाईड च प्रमाण मोठया प्रमाणात असते. त्यामुळे वातावरणात ऑक्सिजन च प्रमाण कमी होईल. समुद्रात सुद्धा कार्बन डायऑक्ससाईड च प्रमाण वाढेल. यामुळे समुद्रातील आम्लाचे प्रमाण सुद्धा वाढेल. याच्या वाढीमुळे समुद्रातील सजीव सुष्टीला त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल.
दिवसेंदिवस जगातील तापमानात वाढ होण्याचे कारण काय ?
खूप लोक असे समजतात कि जगातिल तापमानात वाढ आणि घट असं काही नसतं. ते स्थिर असतं त्यात बदल होऊ शकत नाही. पण ही गोष्ट चूक आहे. यासाठी वैज्ञानिकांनी त्याचा शोध घेतला आणि शोधात असे समजले कि मागील शंभर वर्षात पृथ्वीवरील तापमानात 0.8 डिग्रीने वाढ झाली आहे.
यात सर्वात जास्त वाढ म्हणजे 0.6 डिग्रीची वाढ मागील तीन दशकात झाली आहे. त्यासोबत पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. सॅटेलाईटच्या एका रिपोर्ट नुसार मागील काही दशकात पाण्याच्या पातळीत 3mm इतकी वाढ झाली आहे. वाढत जात असलेल्या तापमानाने बर्फाळ प्रदेशातील बर्फ वितळून त्यांचे पाण्यात रूपांतर होते. आणि यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. या वाढत जात असलेल्या तापमानांमुळे अंटार्क्टिका सोबत जगातील अनेक जागी बर्फ विरघळत आहे.
एका रिपोर्ट नुसार 1979 साल पासून अंटार्क्टिका जवळील आर्टिक महासागरातील बर्फ सतत विरघळत जात आहे. त्यानंतर 2012 मध्ये समुद्रातील बर्फाची पातळी सुद्धा कमी होत असल्याचं दिसत आहे. त्याचा गांभीर्याने विचार केल्यास 1979-2000 या काळातील सरासरीच्या तुलनेत 50 % बर्फ कमी झाला आहे. मागील काही वर्षात ग्रीनलँड मधील बर्फाळ प्रदेश झपाट्याने कमी होत आहे. तेथील बर्फ मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.