केशर- Saffron Information In Marathi केशर ला प्रत्येक भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. जसे इंग्रजीमध्ये केशरला saffron असे म्हणतात. केशराचे पीक सर्वच भागात घेता येत नाही. केशरचे पीक घेण्यासाठी समुद्र सपाटीपासून किमान २००० – २५०० मीटर उंचीचा बर्फाळ प्रदेश हवा. त्यातच केशरचे पीक घेता येते.
केशर- Saffron Information In Marathi
केशर हा अत्यंत दुर्मिळ आणि महागडा पदार्थ आहे. केशराचे आपल्या शरीराला आरोग्याला आणि त्याचा मनाला देखील खूप फायदा आहे. केशर खाल्ल्यामुळे आपला ताण कमी होतो तसेच कोणत्याही प्रकारचा मनोविकार दूर होतो.
गरोदर महिलेच्या बाळाच्या आरोग्यासाठी केशर खूप लाभदायक असते. केशर खाणे यात सुद्धा काही पद्धत आहे. केशर उष्ण पदार्थ असल्याने आपण याला दुधासोबत घ्यायला हवं आणि त्यात सुद्धा १-२ कांड्या टाकायच्या. केशर खाल्ल्यामुळे आपले शरीर त्याच सोबत आपले सौन्दर्य सुद्धा छान होते.
केशरचे सेवन रोज नियमित करायला हवे ज्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. केशर हे फळ नसून ते फुलाचे पुंकेसर आहे.
केशरचे खूप प्रकार आहेत यात अमेरिकन केशर, हिमालयीन केशर, चायना केशर, आणि अफगाण केशर अशा केशरच्या प्रजाती आहे. त्यात हिमालयीन केशर हे सर्वात उत्तम दर्जाचे आणि आरोग्यासाठी आवश्यक असे आहे. आणि चायना केशर हे यातील सर्वात हलके असते आणि याची किंमत प्रतिग्रॅम २००-२५० रुपये इतकी असते.
याशिवाय बाजारात स्वस्त दरात सुद्धा केशर मिळतात पण ते भेसळ असतात. त्यात फक्त काही प्रमाणातच केशर असते. केशर हे एक मसाल्याचं पदार्थ सुद्धा आहे. याचा वापर मसाले बनविण्यासाठी देखील होतो. केशर पुरातन काळापासूनच खाण्यात वापरले जात आहे. केशर काही देशातच आढळून येते त्यात भारत, चीन, रशिया, स्पेन, इटली, ग्रीस, इराण यांचा समावेश आहे.
हिमालयीन केशराचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन जम्मू आणि काश्मीर मध्ये घेतल्या जाते. भारतातील जम्मू आणि काश्मीर हे राज्य केशर उत्पादनासाठी प्रमुख मानले जाते. आपण लोक केशराचा भाव ऐकून चक्क व्हाल बाजारपेठेत प्रतिकिलो केशर दोन ते अडीच लाख रुपये इतके विकल्या जाते. या कारणाने केशरचे सेवन करणे सर्वसामान्यांसाठी थोडे अवघड असते. केशर सर वयोगटातील लोकांना लाभदायक आहे. केशरमध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला लागणारे पोषक तत्व असतात.
केशर खाण्याचे फायदे..
१) स्मरणशक्ती वाढते व स्वयंपाकासाठी उपयुक्त :- भारतात पुरातन काळापासूनच खाण्यात केशराचा वापर केला जातो. केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी मानसीक रित्या सुद्धा फायदा होतो. खूप प्रकारच्या गोड पदार्थात केशरचा वापर करतात. त्यात चव सुद्धा येते आणि त्याने सजवते सुद्धा.त्याचसोबत याचा वर सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे कि आपण आपल्या दररोजच्या आहारात केशरचा वापर करू शकत नाही कारण केशर उष्ण पदार्थ आहे.
ज्याचे अधिक सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. खाण्यात याचा वापर केल्याने त्याची चव पुन्हा वाढते. केशरच्या नियमित सेवनामुळे आपल्या मेंदूला त्याचा खूप फायदा होतो. आणि जर आपले मेंदूचे आरोग्य सुधारते यामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते. आपला ताण कमी होतो. मनाची एकाग्रता वाढते.
२) दमाचा त्रास कमी होते व पचनक्रिया सुधारते :- प्राचीन काळात जर एखाद्याला दमाचा त्रास होतअसेल तरत्यांना केशर देऊन यांचा इलाज करायचे. केशराच्या नियमित सेवनामुळे आपली पचनक्रिया सुधारते. त्यातल्या त्यात केशर आणि दुध मिळून घेतले तर त्याचा फायदा चांगला होतो.
खूप डॉक्टर सुद्धा दम्यासाठी केशर खाण्याचा सल्ला देतात. केशरच्या सेवनामुळे फुफुसावरची सूज कमी होते. त्याचसोबत ज्या लोकांना पोट दुखण्याचा आणि ऍसिडिटीचा त्रास होत असेल असे लोक सुद्धा केशर नियमित खाल्ल्याने या त्रासाला दूर करू शकतो.
३) झोपसुधारते आणि कर्करोगापासून बचाव करते :- काही लोक कर्करोगापासून त्रस्त असेल त्या लोकांना डॉक्टर सुद्धा त्यांचा आहारात केशर खाण्याचा सल्ला देतात. कारण केशर खाल्ल्याने आपल्याला त्याची भीती कमी जाते. केशराच्या नियमित सेवामुळे आपल्याला याप्रकारचा त्रास होत नाही.
केशर हा कर्कररोगावर उपाय आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगावर केशर हा फायदेशीर आहे.त्याचसोबत सध्या सर्वच लोक आपापल्या कामात व्यस्त असतात त्यात त्यांच्या कामाच्या तणावामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही यामुळे त्यांचे काम सुद्धा चांगले होत नाही.
यासाठी आपण आपल्या आहारात केशराचा वापर करू शकतो. आपली झोपची समस्या कमी करण्यासाठी आपण दररोज झोपताना दूध आणि केसर घ्यायला हवे.