आवळा खाण्याचे काही फायदे- Some Of The Benefits Of Eating Amla In Marathi आवळा या फळामध्ये खूप प्रकारचे पोषक घटक असते. आपल्या शरीराला पोषक आणि आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असे घटक आवळ्यात असते. आवळा खाल्ल्याचा आपल्या शरीराला खूप फायदा आहे.
आवळा खाण्याचे काही फायदे- Some Of The Benefits Of Eating Amla In Marathi
आवळ्यात खूप प्रकारचे घटक जसे, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडेन्ट आणि फायबर असे घटक असतात. एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा वाटत असेल आणि त्याला अस्थिर वाटतं असेल तर त्याला आवळा खायला घालू शकतो. कारण आवळा आपले मन आणि आरोग्य स्थिर ठेवते. आणि आपल्याला कोणत्याही बिमाऱ्यांपासून बचाव करण्याचे काम करते.
आवळा खाल्ल्याने आपले शरीर कोणताही परिस्थिती कोणत्याही प्रकारच्या रोगाशी लढण्याची ताकद ठेवते. म्हणजेच आवळा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. आवळा केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर शरीराच्या इतर अवयवांसाठी देखील खूप उपयुक्त आहे.
आपल्या केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवळा केसांच्या तेलामध्ये सुद्धा मिळवले जाते. काही तेलात आवळ्याचे प्रमाण जास्त असते. कारण आवळा आपल्या केसांसाठी खूप प्रमाणात उपयुक्त आहे. तसेच आपल्या सौंदर्यासाठी देखील आवळा खाणे आपल्याला उपयुक्त असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणि आपली त्वचा छान होते.
आवळ्याला खाण्याचे काही प्रकार सुद्धा आहेत. त्यात आवळा खाण्याचे एकूण तीन प्रमुख फायदे आहेत. त्यात कच्चा, सुखा आणि मुरुंबा असे तीन प्रकार आहेत. यातील कोणत्याही प्रकाराने आपण आवळा खाल्ला तर त्याने सारखाच फायदा होईल. आवळा खाण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळची आपण नाश्ता करण्याअगोदर जर आवळ्याचा रस पीत असाल तर आपल्याला फायदेशीर ठरेल.
त्याचसोबत काही भागात आवळ्याचे लोणचे सुद्धा बनवले जाते आणि ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. आवळा कोणत्याही परिस्थितीत खाऊ नये. कारण आपण योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे आवळा खाल्ला नाही तर आपल्याला तो हानिकारक सुद्धा ठरू शकेल. जाणून घेऊया आवळा खाण्याचे काही फायदे.
आवळा खाण्याचे काही फायदे :-
1) एखाद्याला त्याचा चेहऱ्यावर असलेल्या मुरूम, फोड याचा त्रास असेल तर त्यावर आपण आवळा लावणे हा उपाय करू शकतो. कारण या फळात व्हिटॅमिन सी असते जे आपल्या त्वचेला चांगली बनवते. आणि आपल्या त्वचेच्या समस्या दूर करते.
रोज नियमित पणे आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या त्वचेवर वेगळाच ग्लो येतो आणि आपली त्वचा सुंदर दिसू लागते. तसेच ज्या स्त्रिया गर्भवती असतात त्यांना त्यांच्या गरोदरच्या वेळी आवळा खाणे फायदेशीर ठरते. कारण आवळा खाल्ल्याने पोटातील बाळाला चांगले पोषण मिळते. आणि येणारे बाळ तंदुरुस्त आणि सुंदर येते.
2) आवळ्यापासून मोरावळा तयार होतो हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. यामुळे आपल्या पोटाचा त्रास कमी होतो. त्याचसोबत आपले पोट नेहमी साफ राहतं. पोट दुखण्यासारख्या समस्यांपासून आपण दूर असतो. पित्ताचा त्रासही होत नाही.
खूप लोकांना त्यांच्या दिवसभराच्या कामानंतर अशक्तपणा वाटतं असते अशा लोकांसाठी मोरावळा खाणे हा चांगला उपाय आहे. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होते. त्याचसोबत आपल्याला दातांसंबंधी समस्या जसे हिरड्यांना रक्त येणे, तोंडाला फोड येणे, तोंड येणे अशा समस्या दूर होते. आपण नियमित आवळा खाल्ल्याने अशा समस्या आपल्या पासून नेहमी दूर असते. आणि आपले आरोग्य चांगले असते.
3) खूप लोकांना काही गोष्टी आठवणीत राहत नाही. त्यांना विसरण्याची खूप समस्या असते. आणि या पासून ते लोक खूप त्रासून असते. अशा लोकांना या समस्येपासून सुटका हवी असते. यासाठी आपण त्यांना आवळा खायला देऊ शकतो. यामुळे आपल्या मेंदूचे आरोग्य सुधारते आणि आपली स्मरणशक्ती वाढते. तसेच आपल्या बुद्धीची आठवण ठेवण्याची क्षमता वाढते.
तसेच आवळा खाण्याचा आपल्या केसांना सुद्धा चांगला फायदा होतो आणि आपल्या केसांचे आरोग्य सुधारते. ज्या स्त्रियांना केसांबाबत समस्या असते अशा स्त्रियांनी आवळा असलेले तेल त्यांच्या केसांना लावणे त्यांना फायदेशीर ठरते. यामुळे त्यांचे केस मऊ आणि लांब होते.
4) खूप लोकांना त्यांच्या वृद्ध अवस्थेत हाडांच्या खूप समस्या असते आणि यामुळे ते लोक त्रासून असतात. काही लोक यामुळे या समस्यांमुळे त्रासून असतात आणि काहींना तर यामुळे चांगल्या प्रकारे चालता सुद्धा येत नाही.
खूप लोकांना मोठं मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी अशा लोकांना आवळा खाणे फायदेशीर ठरते कारण आवळा खाणे आपल्या हाडाच्या मजबुतीसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपले हाड मजबूत होतात. आणि त्याबद्दलच्या समस्या सुद्धा दूर होतात. तसेच काहींना पोटाचा खूप त्रास असतो.
अशा लोकांना सुद्धा आवळा खाणे खूप फायदेशीर असते. यावेळी आपण आवळ्याला वाळवून त्याचा पावडर बनवून त्याला कोमट पाण्यात मिळवून पिणे खूप फायदेशीर असते. किंवा केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तो बनवलेला पावडर आपण आपल्या केसांना सुद्धा लावू शकतो. यामुळे केसं लांब आणि मऊ होते.
5) आवळ्याची चव काही प्रमाणात आंबट असल्याने काही वेळी लहान मूल आवळा खाण्यास नकार देतात आणि त्यांना ते न खाऊ असे वाटत असते. यावेळी त्यांना आवळ्याचा मोरावळा म्हणजेच मुरुंबा बनवून त्यांना पोळीसोबत खायला दिल कि ते सहज पणे त्याचा आनंद घेत खाणार आणि लहान मुलांना सुद्धा याचा चांगला फायदा होईल आणि त्यांचे आरोग्य सुद्धा तंदुरुस्त आणि निरोगी राहील.
तसेच आवल्यातर खूप पोषक घटक असल्याने आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपण नेहमी कोणत्याही रोगाशी झुंज द्यायला नेहमी तत्पर असतो.