स्वाभिमान- Swabhiman Story In Marathi

स्वाभिमान- Swabhiman Story In Marathi गोविंद नावाचा एक मुलगा शाळेत शिकत होता. तो खूप गरीब होता. अंगावर घालायला कपडे न्हवते पण शाळेची फी मात्र तो वेळेवर द्यायचा. इतर विद्यार्थ्यांना त्याचे खूप आश्चर्य वाटायचे. तो चोरी तर करणं नसेल ना अशी शंका त्यांच्या मनात यायची. त्यांनी एक कट रचला त्यात गोविंदाला चोर ठरवलं. प्रकरण प्राचार्य पर्यंत गेले.

स्वाभिमान- Swabhiman Story In Marathi

स्वाभिमान

गोविंद म्हणाला, “मी शपथ पूर्वक सांगतो कि मी चोरी केली नाही. मी साक्षीदार आणले आहे.” एक माली आणि एक म्हातारी बाई साक्षीदार म्हणून आले होते.

म्हातारी म्हणाली, “माझ्या घरी भाजीपाला आणायचे तो काम करतो, मी त्याला पैसे देते.” माली हि म्हणाला “माझ्याकडे रात्री तो पाणी भरतो मी त्याला त्याचे पैसे देतो. हा मुलगा चोरी करणे शक्यच नाही. स्वकमाईने जेवढे मिळेल त्यात तो शिक्षण घेत आहे. उपाशी बसेल तो, पण शिक्षण सोडणार नाही.” हे ऐकून प्राचार्यांचे डोळे चमकले. त्यांना गोविंदवर आरोप लावल्याबद्दल राग आला. त्यांनी गोविंदाला बोलावले आणि एक पैश्याचे पाकीट त्याच्या हातात दिले. ते पाहून गोविंद म्हणाला, “मी कष्ट करून शिकणार आहे, दान मिळवून नाही.

तात्पर्य:- स्वाभिमान हाच खरा माणसाचा अलंकार असतो.

Also Read:  गरीब ससा- Garib Sasa Story In Marathi

Share: 10

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment