बदाम खाण्याचे फायदे..- The Benefits Of Eating Almonds In Marathi सर्वांना हे तर माहीतच असेल कि बदाम खाणे शरीरासाठी खूप लाभदायक आहे.बदाम खाल्ल्याने आपल्या बुद्धीची स्मरणशक्ती वाढते.आपण डॉक्टरांकडे गेले असता डॉक्टर सुद्धा आपल्या चांगल्या आरोग्यासाठी बदाम खायला सांगतात.
बदाम खाण्याचे फायदे..- The Benefits Of Eating Almonds In Marathi
बदामामध्ये खूप मोठया प्रमाणात पोषक तत्व असतात.जे आपल्या आरोग्याला खूप फायद्याचे असते.फायबर,प्रोटीन आणि ओमेगा ३ याचे प्रमाण बदाम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते.त्याचसोबत बदाम मध्ये अँटी-ओक्ससाईड्स आणि प्रथिने याचा सुद्धा मुबलक प्रमाणात समावेश असतो.त्याचसोबत बदाम मध्ये कॅलरी सुद्धा कमी प्रमाणात असते ज्यामुळे आपले वजन सुद्धा वाढत नाही.आणि वजन जास्त असल्यास कमी करण्याचे सुद्धा काम करते.
आपले वजन जास्त असेल आणि आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात असेल आणि त्यामुळे त्रासून असेल तर त्यासाठी बदाम खाणे योग्य आहे, कारण बदाम मध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते ज्यामुळे आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागत नाही.शरीरातील बाकीच्या अवयवपेक्षा बदाम खाल्ल्याने आपल्या मेंदूला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो.आणि आपली विचार करण्याची शक्ती वाढते.बदाम चवीला सुद्धा चांगले असते.त्यामुळे लोक याला मोठ्या आनंदाने खातात.
बदाम सुके खाण्यापेक्षा याला भिऊन खाल्य्याने यातला पोषक गुणधर्म पुन्हा वाढतो.कारण बिजवलेल्या बदामात त्याचा साली मध्ये टॅटिंन असत जे त्यातील पोषक तत्वास नुकसान पोचवतं यामुळे भिजवलेले बदाम साली सकट खाणे टाळावे.जेणेकरून आपल्याला त्यातील पोषक तत्व पूर्ण प्रमाणात मिळावे.भिजवलेले बदाम खाण्यास सोपे आणि पचनास हलके असते ज्यामुळे आपले पचन सुरळीत होते.यामुळे बरेचसे आजार बरे होतात.बदामाचे खूप फायदे आहेत.चला तर बघूयात बदामाचे फायदे.
बदाम खाण्याचे फायदे..
१) शरीरातील पचन क्रिया सुधारते :-
बदामामध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असते आणि त्यामुळे आपले वजन सुद्धा वाढत नाही आणि त्यात कमी प्रमाणात कॅलरी असल्यामुळे याचे सेवन केल्याने आपल्याला आपले पोट भरलेसे वाटणार पण त्यात शरीराला हवे तेवढेच कॅलरी मिळणार.आणि बदाम पचनासाठी सुद्धा हलके असतात.
सुक्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम आपल्या शरीरातील एन्झाइमची मात्रा वाढवते आणि यामुळे आपल्या शरीरातील पचन क्रिया सुधारते आणि सुरळीत होते.आहारपेक्षा बदाम हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम आणि पोषक आहार आहे.
बदाम खाल्ल्याने आपल्या भूकेवर सुद्धा नियंत्रण असते ज्यामुळे आपण जेवण कमी प्रमाणात करतो आणि याच कारणाने आपले वजन कमी होण्यास मदत होते.आयुर्वेद आणि आणि आयुर्वेदिक औषध बनविण्यासाठी सुद्धा बदामाचा वापर केला जातो.
२) शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असते :-
बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला हवे तेवढ्याच प्रमाणात कॅलरी मिळते.बदाम पचनासाठी सुद्धा हलके असते.यामुळे बदाम खाल्ल्याने आपले पोट भरलेले सुद्धा असते आणि आपल्याला भूक सुद्धा लागत नाही आपले जेवण सुद्धा कमी होते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
बदामाच्या नियमित सेवनामुळे आपल्या हृदयाला आणि मेंदूला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.यामुळेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी कमी करण्यास मदत मिळते.जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल ची मात्रा कमी असेल तर यामुळे आपल्या रक्तदाबात काही परिणाम होत नाही आणि यामुळे आपले हृदयाचे आरोग्य सुद्धा चांगले असते.
३) वजन नियंत्रणात असते :-
बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते ज्यामुळे आपले वजन नियंत्रण राहायला मदत मिळते.त्यात सुक्या बदामापेक्षा भिजवलेल्या बदाम कॅलरी त्याहूनही कमी प्रमाणात असते.बदाम खाण्याचे सुद्धा कहाणी नियम आहेत, बदामाच्या अति सेवनामुळे आपल्याला त्रास सुद्धा होतो.यामुळे दिवसभरात ४-५ बदामाचं खायला हवे.जेणेकरून आपल्याला शरीराला काही हानी न पोहोचता पोषक तत्व मिळायला हवे.
बदाम कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने असल्या शरीरात जास्त प्रमाणात कॅलरी तयार होऊ देत नाही आणि त्यामुळे चरबी सुद्धा वाढू देत नाही आणि आपले वजन नियंत्रणात असते.हे आहे नियमित बदाम खाण्याचे फायदे.