कलिंगड खाण्याचे फायदे-The Benefits Of Eating Watermelon In Marathi उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले कि सगळीकडे कलिंगड विकायला दिसतात. कारण कलिंगड हे थंड फळ आहे जे आपण उन्हाळ्यात खाल्लं कि आपलं शरीर थंड ठेवतो. कलिंगड खाणे आपल्या शरीरासाठी खुप लाभदायक आहे.
कलिंगड खाण्याचे फायदे-The Benefits Of Eating Watermelon In Marathi
उन्हाळ्याचा हंगामात कलिंगड खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कारण हे फळ थंड असल्याने त्याचे सेवन उन्हाळ्यात जास्त प्रमाणात केले जाते. कलिंगड खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. पण काही लोकांना याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. कारण कलिंगड खाल्ल्याने जेवढे फायदे आहेत तेवढेच नुकसान सुद्धा आहेत.
काही लोकांना त्यामुळे समस्या सुद्धा होऊ शकते. कलिंगड हे एकमात्र असे फळ आहे कि ज्यात पाण्याचे प्रमाण हे इतर फळांच्या तुलनेत जास्त असते. यामुळे हे फळ जर आपण उन्हाळ्यात खाल्लं कि आपलं पोट थंड ठेवते. कलिंगड मध्ये बाकीच्या फळांच्या तुलनेत पाण्याची मात्रा जास्त असली तरी हे खाल्ल्याने आपल्या शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही.
कलिंगड हे फळ सुद्धा इतर काही फळांप्रमाणेच वजन कमी करण्यात मदत करते. पण आपल्याला याबद्दल एक बाब जाणून आश्चर्य होईल कि हे फळ लाभदायक असले तरी आजारामध्ये याचे सेवन करू नये. या दरम्यान हे फळ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
सध्या वजन हा सर्वात मोठा प्रश्न सगळीकडे पडला आहे. त्यात सर्वांना वजन कमी करणे हे गरजेचे आहे. त्यासाठी कलिंगड हा लाभदायक आहे. कलिंगड मध्ये प्रोटीन असल्याने ते खाल्ल्याने आपल्याला आपल्या शरीराला पुरेसे आहार सुद्धा मिळतो आणि त्याच सोबत कलिंगड खाल्ल्याने आपले पॉट भरून राहते.
पोट भरलेले असल्याने आपल्याला भूक सुद्धा लागणार नाही. याचा वापर आपण डायटमध्ये सुद्धा करू शकतो.त्याचसोबत कलिंगड आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा लाभदायक आहे. हे खाल्ल्याने आपली इम्युनिटी सुद्धा वाढते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए असते त्यामुळे हे जीवनसत्व आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते.यामुळे आपल्याला डोळयांच्या समस्या सुद्धा कमी होते.
कलिंगड मध्ये थंड पण खूप जास्त प्रमाणात असते यामुळे ते आपल्या पोटाबरोबर आपले डोके सुद्धा थंड ठेवण्याचे काम करते.जर आपले डोके थंड व शांत असेल तर आपल्याला डोकेदुखी सुद्धा होणार नाही. रक्तदाबासाठी सुद्धा कलिंगड खुप लाभदायक आहे. कलिंगड मध्ये सोडियम ची मात्रा खूप कमी प्रमाणात असते.
ज्या लोकांना दमा, अस्तमा याचा त्रास असेल किंवा एखाद्या व्यक्तीची प्रकृती सुद्धा बिघडली असेल तर त्यावेळी या लोकांनी कलिंगड खाऊ नये. त्याच बरोबर कलिंगड खाल्ल्या नंतर पाणी पिऊ नये. कलिंगड मध्ये पाण्याची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते यामुळे त्यावरून पाणी पिल्याने आपल्याला उलटी होऊ शकते. रात्रीच्या वेळी सुद्धा कलिंगड खाऊ नये कारण कलिंगड थंड आहे आणि त्यात पाणी सुद्धा जास्त प्रमानात असतं. यामुळे रात्री वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला कफ होण्याची शक्यता असते.