महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक-The first assembly election in Maharashtra In Marathi

महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक-The first assembly election in Maharashtra In Marathi महाराष्ट्र हा 1 मे 1960 रोजी स्थापन झाला. त्या दरम्यान महाराष्ट्रात सर्वात मोठे नेते म्हणून यशवंतराव चव्हाण यांची ओळख होती. आणि त्यांनीच महाराष्ट्रात राजकारणाची सुरुवात केली. त्यांनी तरुण आणि हुशार अशा नेत्यांना कांग्रेस मध्ये आणले.

महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक-The first assembly election in Maharashtra In Marathi

महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक

महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर 1961 मध्ये महाराष्ट्रात पंचायत राज सुरु झाला आणि या पंचायत राजमुळे कांग्रेस ला त्यांच्या नेत्यांचे पुनर्वसन करणे सोपे गेले. त्यानंतर अनेक दलित गट हे कांग्रेस मध्ये विलीन झाले.

शेकाप या पक्षच अनेक आमदार आणि खासदार हे कांग्रेस मध्ये गेल्याने शेकापच्या जागा कमी झाल्या आणि त्या 15 जागांवर येऊन ठेपल्या. महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठी भाषेच्या महाराष्ट्रात विधानसभेची गठन करण्यासाठी 1962 या साली लोकसभा निवडणूक होत्या, दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकी दरम्यान पहिली विधानसभा निवडनुक सुद्धा घेण्यात आली.

साल 1962 च्या निवडणूक भारतातील लोकसभेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणूक होत्या. महाराष्ट्रात पहिली विधानसभा निवडणूक ही 19 फेब्रुवारी 1962 रोजी 264मतदारसंघात घेण्यात आली.

महाराष्ट्रात पहिल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान 60.36 % मतदान झाले होते. यात पुरुषांची संख्या 1 कोटी 94 लाख इतकी होती आणि महिलांची संख्या 92 लाख इतकी होती होती. यावेळी महाराष्ट्रात 264 जागांसाठी पहिल्यांदा निवडणूक झाल्या होत्या आणि या 264 जागांसाठी 1161 उमेदवार उभे होते. या पैकी महिला उमेदवाराची संख्या ही फक्त 36 इतकी होती पण त्यातील 13 महिला उमेदवार विदहनसभेच्या सदस्य म्हणून निवडूनआल्या होत्या.

1962 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत सामान्य वर्गातील उमेदवाराची संख्या 217 होती तर अनुसूचित जाती मधून 33 तर अनुसूचित जमाती मधून 14 उमेदवार होते.

पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत 6.31 मत बाद ठरले होते. 1962 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस ने 264 जागांपैकी 215 जागा मिळवून महाराष्ट्रात विजय मिळवला होता. म्हणजेच संपूर्ण झालेल्या मतांपैकी कांग्रेस ला 51.22  % इतके मत पडले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top