विदूषकाचा धडा- Vidrushakacha Dhada Story In Marathi

विदूषकाचा धडा- Vidrushakacha Dhada Story In Marathi एकदा एक विदूषक लोकांना एक विनोद सांगत होता. विनोद ऐकून लोक जोरजोरात हसू लागले. काही वेळाने विदूषकाने पुन्हा तोच विनोद सांगितलं. यावेळी कमी लोक हसले.

अजून थोडा वेळ गेल्या वर विदूषक तिसऱ्यानंदा तोच विनोंद सांगू लागला. पण त्याच बोलणं संपण्या आधी एक प्रेक्षक मधेच उठला आणि रागात म्हणाला अरे! तोच विनोद किती वेळा सांगणार अजून एकही सांग. यावर आता हसू येत नाही.

विदूषकाचा धडा- Vidrushakacha Dhada Story In Marathi

विदूषकाचा धडा

 

 

विदूषक जरा गम्भीर झाला आणि म्हणाला धन्यवाद! मलाही हेच म्हणायचे आहे जेव्हा आपण आनंदाच्या एका कारणाने पुन्हा पुन्हा आनंदी राहू शकत नाही, तर दुःखाच्या एका कारणाने आपण पुन्हा पुन्हा दुखी का होतो? मित्रांनो, आपल्या आयुष्यात दुःख जास्त आणि आनंद कमी होण्याचे हेच कारण आहे. आपण आनंदाचा क्षण लवकर विसरून जातो, सहजपणे.

पण दुःख मात्र धरून बसतो. जीवनात सुख दुःख येताच राहतात. ज्याप्रमाणे एका सुखाने आपण पुन्हा पुन्हा सुखी होऊ शकत नाही त्याचप्रमाणे एका दुःखाने पुन्हा पुन्हा दुखी होऊ नये जीवनात यश तेव्हाच मिळते जे आपण दुःख विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.

Also Read:  विधी लिखित-Widhi Likhit Story In Marathi

Share: 10

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment