Y दर्जाची सुरक्षा नेमकी काय आहे-What exactly is Y level security In Marathi हि सुरक्षा जास्त तर दिग्गज्यांना दिली जाते. एखाद्या व्यक्तीचा जीवाला धोका असला कि सरकार वेळोवेळी हि सुरक्षा दिली जाते. सरकार वेळोवेळी दिग्गज नेते , मोठे अधिकारी आणि आणि इतर अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा बाबत यादी बनवत असत. त्यात नाव बदलली जातात आणि एकदा अशी सुरक्षा हटवली तर त्या वरून राजकीय वादळ ही उभ राहत . पण या सुरक्षा दर्जाचा अर्थ नेमका काय आहे ? हि सुरक्षा खरंच धोका पाहून दिली जाते.
Y दर्जाची सुरक्षा नेमकी काय आहे-What exactly is Y level security In Marathi?
याचा स्टेटस सिम्बोलशी काही संपर्क आहे ?
भारतात लोकप्रिय व्यक्तींना साधारणतः Z + , Z , Y+ ,Y किंवा X दर्जाची सुरक्षा दिली जाते. या मध्ये केंद्रीय मंत्री , मुख्यमंत्री, सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाचे न्याय मूर्ती , लोकप्रिय नेते आणि वरिष्ठ नेत्यांचा समावेश असतो .
या शिवाय इतरांनाही हि सुरक्षा पुरवली जाऊ शकते . Z+ दर्जाची सुरक्षा हि भारतातली सर्वात कडक सुरक्षा मानली जाते . हि अत्यंत महत्वाच्या व्यक्तींना पुरवली जाते . यामध्ये 36 जवान तैनात असतात. यामध्ये SPG आणि NSG कमांडोसुरक्षे साठी तैनात असतात . यात पाहिलं सुरक्षा कडं NSG च असतं तर दुसऱ्या पातळीवर जबाबदारी SPG कडे असते . याशिवाय ITBP आणि CRPF चे जावन सुद्धा या सुरक्षेत सहभागी असतात .
Z दर्जाच्या सुरक्षेत 22 सुरक्षाकर्मी असतात . या दर्जाच्या सुरक्षेत INDOTIBETENT बॉर्डर फोर्स आणि केंद्रीय पोलीस बल म्हणजे CRPF चे जवान आणि अधिकारी सुरक्षे साठी तैनात केले जातात . या दर्जाच्या सुरक्षेत SCOTS आणि पायलट वाहनही दिले जातात . Y दर्जाच्या सुरक्षेत सुरक्षा रक्षकांची सुरक्षा 11 असते , आणि यामध्ये दोन खासगी सुरक्षा कर्मी यांचा समावेश असतो.
तर Y + दर्जाच्या सुरक्षेत SCOT वाहन यांच्या सोबत खासगी सुरक्षका शिवाय राहत्या घरी एक सुरक्षा अधिकारी आणि चार सुरक्षा कर्मी तैनात असतात . या सुरक्षारक्षकांमध्ये एक पोलीस निरीक्षक दर्जाचा पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकारी सुद्धा असतो . त्या शिवाय ३ बंदूकधारी सुरक्षा कर्मचारी यांचाही समावेश असतो .
X दर्जाच्या सुरक्षेत 2 सुरक्षा रक्षक मिळतात. या मध्ये एका खासगी सुरक्षा अधिकाऱ्याचा समावेश असतो . पाहता पंतप्रधान हे पण सर्वोच्च महत्वाचं पद आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा अत्यंत मजबूत हातांमध्ये आहे . भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीच संरक्षण SPG कडून केलं जात , त्या शिवाय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना हि परिस्थिती नुसार हि सुरक्षा प्रदान केली जाते .
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्ते नंतर चार वर्षांनी म्हणजे 1988 मध्ये SPG ची स्थापना केली होती . SPG वार्षिक बजेट 300कोटी पेक्षा जास्त आहे तर हि सुरक्षा देशातली सर्वात महागडी आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था मानली जाते.