आधार PVC कार्ड म्हणजे काय ? What is Aadhaar PVC Card In Marathi?

आधार PVC कार्ड म्हणजे काय ?What is Aadhaar PVC Card In Marathi? आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्रे झाले आहे.बँकेत खाते उघडायला किंवा कोणतेही सरकारी काम करण्यासाठी याची गरज नेहमी भासते.

आधार कार्डला ओळखपत्र प्रमाणे वापरल्या जाते.त्यासाठीच लोक याला आपल्या पाकीट मध्ये ठेवतात. कारण याचे काम कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही कामासाठी काम पडू शकते.

आता त्याच गोष्टीला लक्षत घेऊन सरकारने आधार PVC कार्ड ची घोषणा केली आहे. आणि आधार कार्ड हे कागदपत्र आपल्याला खूप महत्वाचे आहे हे प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे.आपल्या सर्व ठिकाणी आपल्याला याचे काम पडते.आणि हे नेहमी आपल्या सोबत असणे गरजेचे आहे.चला तर जाणून घेऊया असे महत्वाचे कागदपत्र आपण काढावे कसे ,याच्या साठी आपल्याला काय करावे लागेल.

 

Aadhar PVC Card

आधार PVC कार्ड म्हणजे काय ?What is Aadhaar PVC Card In Marathi?

आपण आधार PVC कार्ड ची गोष्ट करत आहोत.आधार PVC कार्ड हे आपल्या ATM कार्ड प्रमाणेच असते.जे कार्ड तुमच्या गैरवापरामुळे फाटण्याची भीती राहणार नाही.हे कार्ड असं असणार कि जे पाण्यात पडून सुद्धा खराब होणार नाही.या कार्डला वापरणे सुद्धा खूप सोपे आहे.ज्या कार्ड मध्ये खूप प्रकारची सुविधा दिली आहे.या कार्ड ची सर्वात महत्वाची बाब हि कि हे कार्ड बनवत असताना आपण एकाच मोबाईल नंबर वरून आपल्या परिवारातील पूर्ण लोकांचे आधार PVC कार्ड काढू शकतो.चला तर जाणून घेऊ आधार PVC कार्ड कसे काढावे.

आधार PVC कार्ड बनविण्याची संपूर्ण माहिती-Complete information on making Aadhaar PVC card In Marathi

सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला हवी कि हे कार्ड काढण्याकरिता आपल्याला ५० रुपये शुल्क भरावे लागते.म्हणजेच असे कि आपण जितक्या लोकांचे कार्ड बनवत असाल त्या सर्व लोकांची आधी वेगळी वेगळी फीस जमा करावी लागेल. म्हणहेच जर तुमच्या परिवारात 4 लोक असेल आणि तुम्हाला सर्वांचे कार्ड काढायचे आहे.तर त्याप्रकारे 200 रुपये शुल्क भरावे लागेल.

आपले आधार कार्ड ऑनलाईन प्रकारे काढण्याकरिता सर्वप्रथम आपल्या सरकारच्या http://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंक वर जाणून आपल्या हि लिंक उघडा लागेल.यामध्ये प्रवेश केल्या नंतर आपल्याला तिथे दिले असलेले ORDER AADHAR PVC CARD साठी दिल्या असलेल्या पर्यायावर क्लिक करा.त्या जागी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकावे लागेल.

त्यानंतर CAPTCHA कोड एंटर करा.ते झाल्या नंतर तुम्हाला त्या जागी तुमचा मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी ऑप्शन असतात.तुम्ही आपला मोबाईल नंबर टाकू शकता किंवा नाही टाकायची असल्यास तुम्हाला टाकायची गरज नाही.

या मधून तुम्हाला कोणताही एक ऑप्शन वर क्लिक करता येते.जर तुमच्या कडे मोबाईल नंबर नसल्यास तुम्ही तुमच्या परिवारातील कोणत्याही उमेदवाराचा मोबाईल नंबर टाकू शकता.पण त्या नंबर वर आलेला OTP तुम्हाला त्याठिकाणी एंटर करावी लागेल.एवढं केल्या नंतर तुमचे कार्ड साठी अप्लाय होऊन जाईल.

त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला MAKE PAYMENT अस ऑप्शन येईल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता.पेमेंट तुम्ही कोणत्याही ऑनलाईन प्रकारे म्हणजेच क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करू शकता.

पेमेंट केल्या नंतर तुम्ही डिजिटल सिग्नीचर सोबत तुमची रसीद PDF द्वारे डाउनलोड करू शकता,किंवा त्याशिवाय रसीद वर दिला असलेला 28 अंकी नंबर नि सुद्धा तुम्ही तुमचे कार्ड ट्रॅक करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top