विधी लिखित-Widhi Likhit Story In Marathi

विधी लिखित-Widhi Likhit Story In Marathi एका श्रीमंत व्यापाऱ्याला त्याच्या गावातल्या फकिराने सांगितलं कि, त्याच्या संपत्तीचा मालक लवकर त्याच्या जवळ राहणारा एक गरीब शेजारी होणार आहे, हे ऐकून व्यापारी धास्तावून गेला काय करावं त्याला सुचेना. त्याने निश्चय केला कि तो काही झाला तरी त्या गरीब माणसाला एक फुटकी कवडीही मिळू देणार नाही.

विधी लिखित-Widhi Likhit Story In Marathi

विधी लिखित

एके दिवशी त्याला एक युक्ती सुचली त्याने आपली सगळी संपत्ती विकून टाकली आणि त्यातून एक अतिशय मौल्यवान हिरा खरेदी केला. तो हिरा नेहमी आपल्या गळ्यात बांधून ठेवत असे.

एकदा तो नवाने प्रवास करीत असताना त्याची नाव पाण्यात उलटली स्वतःला वाचविण्यासाठी तो पोहून नदीच्या किनाऱ्यावर आला किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर त्याने आपल्या गळ्यात हिरा आहे कि नाही बघितले तर तो थक्क झाला .हिरा त्याच्या गळ्यात न्हवता त्याने पुन्हा पाण्यात उडी मारली पण त्यालाही कळून चुकले होते .

आता त्याला काही मिळणार नाहीये तो खूप दुखी झाला आपल्या मनाची समजूत काढून तो स्वतःशी म्हणाला”ठीक आहे त्या गरीब शेजारऱ्याला तर नाहीना मिळाला हिरा.

काही दिवस नंतर त्या गरीब शेजाऱ्याने एक मोठा मासा खरेदी करून आणला. त्याने तो चिरला तर त्याचा पोटात त्याला तो हिरा सापडला तो आश्चर्याने हिरा पाहू लागला. अशा रीतिने त्याला व्यापाराचीसंपत्ती मिळाली.

तात्पर्य :- ज्याचा जो वाटा असतो ,तो त्याला मिळतोच.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top