योगा बद्दल माहिती – Yoga Information In Marathi सर्वांना वाटते कि आपण सुद्धा तंदुरुस्त असायला हवं. आपले आरोग्य सुद्धा छान राहायला हवे. आपले मन सुद्धा प्रसन्न असायला हवं. आपले मन प्रसंन्न असले कि आपल्या एखाद्या कामात आपले मन लागते आणि आपले काम नियमित होते.
योग केल्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त असते. आपले शरीर सुद्धा मजबूत होत. त्याच सोबत आपण जर नियमित योगा करत असाल तर आपल्याला त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल आणि आपण ते नित्य नियमाने करायला लागू.
योगा बद्दल माहिती – Yoga Information In Marathi
भारतात योगाला खूप महत्व दिल्या जाते. भारतात योग्य दिवस सुद्धा साजरा केला जातो. योगाचा शोध भारताचं लागला. आणि बाहेरील देशाला आपण योग हा विचार दिला. भारतात मोठ्या प्रमाणात योग गुरु आहेत. जे भारतात योगाला समोर नेण्याचे काम करते. आणि जे लोक नित्य नियमाने योग करतात त्यांना यामधून प्रोत्साहन मिळते.
योगामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. जर तुम्ही नियमित दररोज एक वेळ ठरवून योगा केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही. तुम्ही नेहमी तंदुरुस्त असाल.भारतात योगगुरू म्हणून रामदेव बाबा हे आहे. जे कोणताही प्रकारचा योगा करतात आणि नेहमी तंदुरुस्त असतात. खूप समस्यांवर योग हा पर्याय आहे.
डॉक्टर सुद्धा नियमित योगा करायला सांगतात.आपल्या शरीरातील असा कोणताच भाग नाही कि ज्याला योग केल्यामुळे फायदा होणार नाही.शरीरातीळ सर्व प्रकारच्या समस्या योग केल्यामुळे दूर होते.कोणत्याही प्रकारचे आजार सुद्धा होणार नाही. चला तर जणूंन घेऊ योग करण्याचे फायदे.
योगा करण्याचे फायदे..
1) शरीराच्या सर्व स्तरावर तंदुरुस्ती:- योगा केल्याने शरीराच्या प्रत्येक भागाला त्याचा फायदा होतो.यामुळे शारीरिक स्वतःच नाही तर त्यावसोबत मानसिक आणि भावनिक स्वास्थ सुद्धा योग सोबत चांगलं होतं.
शरीरात एकही रोग नसताना आपण तंदुरुस्त आहोत असं म्हणता येणार नाही तर त्याचसोबत मानसिक आरोग्य सुद्धा प्रसन्न असायला हवं. तेव्हाच आपण कोणतेही काम मन लावून करणार आणि त्या कामात आपल्याला रस वाटणार. याचसाठी योगगुरू योगाला इतके महत्व देतात. हेच त्याच कारण.आपण दररोज एक ठरवलेल्या वेळात नियमित योग केला तर आपण नेहमी तंदुरुस्त असाल.
2) वजन कमी होईल:- आपण नियमित योग करत असाल तर आपले वजन सुद्धा कमी होणार कारण योग करण्याचा अर्थ असाच कि कसरत करणे आणि कसरत केल्याने आपल्या शरिराला भाम येतो हेच त्याचे कारण ज्यामुळे आपल्या शरीराचे जास्त असलेले वजन कमी होते. आणि आपले शरीर मजबूत होते. योगाचे असे खूप प्रकार आहेत ज्यमुळे आपले वजन सोप्या पद्धतीने कमी होते.
कपालभारती, सूर्यनमस्कार आणि प्राणायम या प्रकारच्या योगांनी आपले वजन कमी होण्यास मदत होते.या प्रकारचे योग्य आपण दररोज नित्य नियमाने केलात तर तुमचे वजन नक्कीच कमी होईल.आणि तुमचा आहार सुद्धा वाढणार.
3) ताण तणाव होत नाही:- योग केल्याने फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्य सुद्धा सुधारते. आपण मानसिक रित्या त्रासून असाल तर नियमित शांतेने योग करा आणि त्यानंतर तुमचा मानसिक तणाव कमी होईल.
आपण दररोज सकाळी उठल्यापासून सायंकाळ पर्यंत घडणाऱ्या घटना त्यातील काही घटना अशा असतात ज्या आनंदाच्या असतात आणि काही घटना अशा सुद्धा असतात कि ज्यमुळे आपल्याला ताण येतो आणि त्यामुळे आपण त्रासून असतो. ज्यावर योग हा चांगला पर्याय आहे. कारण यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होते आणि आपण तंदुरुस्त आणि आपले मन प्रसन्न असते.
4) शरीरातील ऊर्जा वाढणे:- आपण जेव्हा योग करतो त्यावेळी आपले मन एकाग्रत असते. आणि त्यात आपले सर्व अवयव कामात असतात. आणि आपण दुसऱ्या कोणताही कामात लक्ष देत नाही करणं आपल्या योगामध्ये आपले मन लागून असते. आणि सतत एकच काम करून आपली ऊर्जा सुद्धा वाढणार. कारण आपण दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतो आणि काही काळ काम केल्यानंतर आप त्रासून जातो आपल्याला काम करण्याची ऊर्जा नसते आणि आपण काम करत नाही. योग केल्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते आणि आपण जास्त प्रमाणात काम करण्यास तत्पर असतो.